Share

‘मुख्यमंत्री अधिवेशनाला आले नाही, यात काही नवीन घडतंय अस नाही’

Published On: 

🕒 1 min read

नागपूर : हिवाळी अधिवेशनाला (Winter session) आजपासून सुरुवात झाली आहे. मात्र, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) अधिवेशनाला आले नाहीत. यावरुन केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी मुख्यमंत्र्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

मुख्यमंत्री अधिवेशनाला आले नाहीत यात काही नवीन घडतंय अस काही नाही. मुख्यमंत्री झाल्यापासून ते मंत्रालयात किती वेळा आले? राज्यात किती दौरे केले? राज्यावरील संकटात ते कधी बाहेर पडले, असे प्रश्न केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी उपस्थित केले आहेत. संघ मुख्यालयाला भेट देण्यासाठी ते आज नागपुरात आले होते. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यावर टीकेचे बाण सोडले आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) आजारी आहेत, हे महाराष्ट्रातील जनतेला माहीत आहे. आम्ही देवाला प्रार्थना करतो की, मुख्यमंत्री लवकरात लवकर बरे व्हावे, आणि जनतेच्या सेवेत रुजू व्हावे, असेही दानवे (Raosaheb Danve) म्हणाले आहेत.

दरम्यान, आज मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीवरुन भाजपच्या अनेक नेत्यांनी भाष्य करत शिवसेनेला डिवचले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देखील रश्मी ठाकरेंना मुख्यमंत्रिपदी बसवण्याचा सल्ला देत शिवसेनेची खिल्ली उडवली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!