Share

महाविकास आघाडीत फूट; शिवसेनेचा बाहेर पडण्याचा निर्णय

Published On: 

कोल्हापूर : जिल्ह्यात महाविकास आघाडीत (Mahavikas aaghadi sarkar) फूट पडली आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेत शिवसेनेला समाधानकारक जागा न मिळाल्याने शिवसेनेने महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच शिवसेनेने नवे पॅनल स्थापन करण्याची घोषणा केली आहे. राज्यात शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे मिळून महाविकास आघाडी सरकार स्थापन झालेले असताना कोल्हापुरात फूट पडल्याने सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत.

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेवर राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचे वर्चस्व आहे. या निवडणुकीत राखीव गटातील नऊपैकी पाच जागांची मागणी शिवसेनेचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी केली होती. मात्र यापैकी तीनच जागा देण्याची तयारी काँग्रेस व राष्ट्रवादीने दर्शविली होती.

त्यामुळे शिवसेनेने बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. दोन वर्षापूर्वी राज्यात झालेल्या सत्ता बदलात दोन्ही काँग्रेसह शिवसेनेने एकत्र येऊन सत्ता स्थापन केली होती. महाविकास आघाडीच्या नेतृत्त्वाखालीच यापुढील सर्व निवडणुका लढण्याचा निर्धार तीनही पक्षांनी केला होता; पण त्याला कोल्हापूर जिल्ह्यातच हरताळ फासण्याचा प्रकार घडल्याने चर्चेला उधान आले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!