🕒 1 min read
मुंबई : आजचा दिवस(१६ डिसें.)संपूर्ण भारतात ‘विजय दिन’ म्हणून साजरा केला जातो. याचे कारण म्हणजे १६ डिसेंबर १९७१ मध्ये भारताने पाकिस्तान विरुद्धचे युद्ध जिंकले होते. या युद्धादरम्यान आपल्या प्राणांची आहुती दिलेल्या शहींदांना आज श्रद्धांजली वाहिली जाते. या पार्श्वभूमीवरच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील(Chandrakant Patil) यांनी बोगराची लढाई ही १९७१ च्या युद्धाचा सर्वाधिक रक्तरंजित अध्याय होता, असे म्हंटले आहे.
यासंदर्भात पाटील यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,’बोगराची लढाई ही १९७१ च्या युद्धाचा सर्वाधिक रक्तरंजित अध्याय होता, तसेच ही या युद्धातील सर्वाधिक काळ चाललेली लढाई होती. बोगरा शहर ताब्यात घेण्यासाठी पराक्रमाची शर्थ करणाऱ्या भारतमातेच्या वीर सुपुत्रांना विनम्र अभिवादन.’
पुढे ते म्हणाले आहेत की,’बांगलादेशमधील बोगरा शहरामध्ये पाकिस्तानने एक मोठे सामरिक आणि लष्करी केंद्र उभारले होते, त्यामुळे बोगरा शहर ताब्यात घेणे गरजेचे होते. बोगरा शहर जिंकल्यावर उत्तर बांगलादेशातील पाकिस्तानी सैन्याला उर्वरित पूर्व पाकिस्तानमधील सैन्यापासून तोडता आले असते. याच अनुषंगाने बोगरा शहर ताब्यात घेण्याची जबाबदारी मेजर जनरल लक्ष्मण सिंह यांच्या नेतृत्वातील २० इंडियन माऊंटन डिव्हिजनवर सोपवण्यात आली. भारत-पाक युद्धाची औपचारिक घोषणा होण्यापूर्वीच २३ नोव्हेंबर १९७१ रोजी बोगराच्या लढाईला सुरुवात झाली आणि पाकिस्तानने शरणागती पत्करल्यानंतर देखील दोन दिवस म्हणजे १८ डिसेंबर १९७१ पर्यंत ही लढाई सुरु होती, म्हणूनच बोगराची लढाई १९७१ च्या भारत-पाक युद्धातील सर्वाधिक काळ चाललेली लढाई म्हणून ओळखली जाते.
बोगराची लढाई ही १९७१च्या युद्धाचा सर्वाधिक रक्तरंजित अध्याय होता, तसेच ही या युद्धातील सर्वाधिक काळ चाललेली लढाई होती. बोगरा शहर ताब्यात घेण्यासाठी पराक्रमाची शर्थ करणाऱ्या भारतमातेच्या वीर सुपुत्रांना विनम्र अभिवादन ! #SwarnimVijayVarsh #VijayDiwas pic.twitter.com/EAFdrljL9D
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) December 16, 2021
दरम्यान, बोगराच्या लढाईमध्ये भारतमातेच्या सुपुत्रांनी दाखविलेल्या शौर्यासमोर पाकिस्तानी सैन्याचा एकही प्रयत्न कामी आला नाही. भारतीय सैन्याने बघताबघता एकामागून एक सर्व परिसर आणि सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या इमारती ताब्यात घेतल्या. भारतीय रणगाड्यांनी पाकिस्तानी सैन्याच्या सर्व चौक्यांवर गोळीबार करून त्या उद्ध्वस्त केल्या. त्यानंतर पाकिस्तानी सैन्याच्या शरणागतीला सुरुवात झाली. बोगराची लढाई ही १९७१ च्या युद्धातील सर्वाधिक रक्तरंजित लढाई होती. या लढाईत शत्रूकडून क्रूरतेचा कळस गाठण्यात आला. ही लढाई प्रत्येक इंच जमिनीसाठी लढली गेली. बोगरा शहर ताब्यात घेणे हा भारतीय सैन्यासाठी ऐतिहासिक विजय होता, असेही पाटील म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- ‘आपल्या महाराष्ट्रात आता पुन्हा एकदा भिर्र होणार…’, अमोल कोल्हेंनी व्यक्त केला आनंद
- ‘बैलगाडा शर्यत आमच्या सरकारमुळेच…’, देवेंद्र फडणवीसांचा दावा
- ‘…राज्य सरकारने आरक्षणात कोणतीही प्रगती केली नाही’, राणेंनी शेअर केली सुप्रीम कोर्टाची ॲार्डर कॉपी
- शर्यती पुन्हा सुरू व्हाव्यात, पण त्यामध्ये गैर प्रकार, पशूधनाचा छळ होऊ नये- मुख्यमंत्री ठाकरे
- बैलगाडा शर्यत सुरू करण्यासाठी राज्य सरकारच्या प्रयत्नांना मिळाले यश
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
