Share

गेवराईतील वाळू प्रकरण विधानसभेत गाजले; महसूलमंत्र्यांकडून भरारी पथकांची स्थापना..!

Published On: 

🕒 1 min read

गेवराई: गेवराईचे भाजप आमदार लक्ष्मण पवार(Lakshaman Pawar) यांनी गेवराईत सुरु असलेल्या वाळूच्या अवैध उत्खननावरुन सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचप्रमाणे ज्या ८ जणांचा वाळू उत्खननादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यांची जबाबदारी कोण घेणार? असा सवाल त्यांनी आजपासून सुरु झालेल्या हिवाळी अधिवेशनात उपस्थित केला होता. त्यावर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात(Balasaheb Thorat) यांनी तालुका स्तरावर भरारी पथकांची स्थापना करण्यात आल्याची माहिती विधानसभेत बोलतांना दिली.

बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील सुरळेगांव येथील गोदावरी नदी पात्रात अवैधरित्या वाळू उपसा होत असल्याबाबतचा प्रश्न विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, सदस्य लक्ष्मण पवार, भास्कर जाधव, आशीष जैयस्वाल, सुनील प्रभू यांनी प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केला होता. गोदावरी आणि सिंदफणा नदीवर अवैध वाळूचा उपसा होत असल्याची माहिती भाजप आमदार लक्ष्मण पवार यांनी दिली. तसेच वाळूचे अवैध उत्खनन थांबवायचे असेल तर त्या वाळूचा लिलाव योग्य रीतीने झाला पाहिजे.

वाळूची किंमत जास्त असल्याने सर्वसामान्य लोकांना घेता येत नसून काही ठराविक लोकच ती घेत आहेत आणि नंतर त्यांना ते परवडत नसल्याने ते अधिकचे उत्खनन करतात. अवैध्य उत्खननामुळे खराब झालेल्या रस्त्यांची जबाबदारी कोण घेणार असा सवाल पवार यांनी उपस्थित केला होता. तसेच ह्या ८ लोकांचा या अवैध खड्डयांमुळे मृत्यू झाला आहे त्यांना कोणतीही मदत राज्य सरकारने केलेली नाही. राज्य सरकार या लोकांची जबाबदारी घेणार आहे का असा सवाल त्यांनी केला. तसेच इथून पुढे ट्रॅक्टर च्या माध्यमातून वाहतुकीला राज्य सरकार परवानगी देणार आहे का असा प्रश्न त्यांनी राज्य सरकारला विचारला

याबाबत थोरात म्हणाले की, गोदावरी नदी पात्रातील जागेचा स्थानिक लोकप्रतिनिधींनी तहसिलदार यांच्यासमवेत पंचनामा केल्यानंतर वाळुमाफियांनी नियमांचे उल्लंघन करून आधुनिक साधनांच्या सहाय्याने अवैधरित्या वाळूचा उपसा करुन नदी पात्रात दहा ते पंधरा फुटापर्यंत खड्डे केले असल्याचे खरे नाही. अवैध वाळू वाहतूक करण्याच्या उद्देशाने आलेल्या एकूण ५ टिप्पर वाहनांवर दंडात्मक कारवाई करुन फौजदारी स्वरुपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. येणाऱ्या काळात जलसंपदा विभागाबरोबर समन्वयाने काम करण्यात येईल.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!