मुंबई: राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरु होत आहे. आणि २८ डिसेंबर २०२१ रोजी संपणार आहे. दरवर्षी हिवाळी अधिवेशन नागपूरला घेण्यात येते. मात्र, यावेळी मुंबईत होणार आहे. दरम्यान आज भाजपा ठाकरे सरकारवर विविध मुद्द्यांवरून आक्रमक होण्याची शक्यता आहे. या अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेदेखील (Chief Minister Uddhav Thackeray) उपस्थित असणार आहेत.
दरम्यान अधिवेशनापूर्वी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी पत्रकार परिषद घेत ठाकरे सरकारवर निशाणा साधला. शेतकऱ्यांची नुकसान भरपाई, मराठा आणि ओबीसी राजकीय आरक्षण, महिला सुरक्षा, नोकर भरती गोंधळ, आरोग्य भरती गोंधळ, महावितरणकडून करण्यात येणारी सक्तीची वसुली अशा विविध मुद्द्यांवरून भाजपा ठकरे सरकारला घेरणार असल्याची दाट शक्यता आहे.
दरम्यान आजपासून हिवाळी अधिवेशन सुरु होत असून अद्याप विधानसभा अध्यक्षांची निवड झालेली नाही. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती.मात्र, त्यांनी राजीनामा देत पक्षाचं प्रदेशाध्यक्षपद स्वीकारल्यानं हे पद रिक्त आहे. दरम्यान हिवाळी अधिवेशनात विधानसभेला नवा अध्यक्ष मिळेल आणि तो काँग्रेसचाच असेल असा दावा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सोमवारी केला. मात्र अध्यक्षपदासाठी कोणाच्या नावाची शिफारस करण्यात येणार आहे, याबाबत त्यांनी काहीच सांगितले नाहीये. तर देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपांना प्रतिउत्तर देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपाला आव्हान दिले आहे. भाजपला जर सरकारकडे आमदारांचं पाठबळ नाही असं वाटत असेल तर त्यांनी अविश्वास ठराव आणावा, आम्ही विश्वासाचा ठराव जिंकू असा दावा अजित पवार यांनी केला आहे.
हिवाळी अधिवेशनात एकूण 26 विधेयके मांडली जाणार-
आजपासून सुरु होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात जवळपास २६ विधेयके चर्चेला घेण्यात येणार आहेत. यामध्ये प्रलंबित विधेयके पाच, प्रस्तावित (मंत्रिमंडळ मान्यता प्राप्त) २१ विधेयके अशी एकूण २६ विधेयके आणि अध्यादेश अधिवेशनात मांडण्यात येणार आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पत्रकार परिषदेत दिली.
महत्त्वाच्या बातम्या
- अखेर औरंगाबाद महानगरपालिकेने भरले ९५ कोटी; नवीन पाणीपुरवठा योजनेच्या कामाला मिळणार गती..!
- औरंगाबादेत आता होम आयसोलेशन बंद; ओमायक्रोनच्या धर्तीवर जिल्हाधिकार्यांचे नवे आदेश..!
- .तर यंदा औरंगाबादेतील क्रांती चौकात थाटात साजरी होणार शिवजयंती
- बदनापूर नगर पंचायतीत बाचाबाचीचे रुपांतर मारहाणीत; आ. नारायण कुचे-संतोष सांबरेत हमरीतुमरी..!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

