Share

अमृता फडणवीसांना विरोधी पक्षनेत्या करणार का?; पेडणेकरांचा चंद्रकांत पाटलांना सवाल

Published On: 

मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी आज अतिशय शांततेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना चिमटा काढत जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्री आजारी असताना त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदावर बसवण्याचा सल्ला चंद्रकांत पाटलांनी दिला. त्यांच्या या सल्ल्यावर शिवसेनेच्या नेत्या आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pedanekar) यांनी सवाल केला आहे. किशोरी पेडणेकर संतापल्या आहेत.

अमृता फडणवीसांना (Amruta Fadnavis) विरोधी पक्षनेत्या करणार का? असा सवाल करत किशोरी पेडणेकरांनी आपला संताप व्यक्त केला आहे. ‘चंद्रकांतदादा हे भाजपचे एक मोठे नेते आहेत.ते मोठे नेते आहेत. त्यांच्याबाबत मी बोलणे योग्य होणार नाही. भाजप नेते सातत्याने स्त्रीयांबद्दल आक्षेपार्ह बोलतात. ही हिंदू धर्माची शिकवण नाही’, असे किशोरी पेडणेकर म्हणाल्या आहेत.

रश्मी ठाकरे या कधी लाईन लाईफमध्ये नसतात. रश्मी ठाकरे यांच्यावर टीका करणे योग्य नाही. ते सहन केले जाणार नाही. मात्र, अमृता फडणवीस सतत ॲक्टीव आणि लाईन लाईफमध्ये असतात. त्यांना विरोधी पक्षनेत्या बणवणार का, असा सवालही त्यांनी केला. जर भाजपचे नेते असंच बोलणार असतील तर आम्ही पंतप्रधान मोदी यांची भेट घेऊ, असा इशाराही यावेळी किशोरी पेडणेकरांनी दिला आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री आजारी असल्यामुळे ते गैरहजर असणे स्वाभाविक आहे. आमच्या एवढाच आग्रह असा आहे की, परंपरेनुसार तुम्ही कुणाला तरी चार्ज द्यावा. त्याची प्रोसेस लंबी आहे. त्यासाठी चार्ज राज्यपालांकडे रजिस्टर करावा लागतो. तुम्ही राज्यपालांना कितीही मानायचे नाही ठरवलं तरी सुद्धा राज्यपालाशिवाय काहीही करता येत नाही, असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

अन्य दोन सहकाऱ्यांसोबतचा अविश्वास स्वाभाविकच आहे. कारण त्यांनी तो चार्ज घेतला, तर सोडणारच नाहीत. त्यांच्या जर पक्षातही कोणाकडे विश्वास नसेल, तर रश्मी वहिनींना चार्ज देवून त्यांना मुख्यमंत्री करता येऊ शकते. रश्मी ठाकरे मुख्यमंत्री झाल्यास आम्हाला आश्चर्य वाटणार नाही. त्यांना मंत्री म्हणून सामील करून घ्या. आदित्य ठाकरें (Aaditya Thackeray) नाही ते चार्ज देवू शकतात. मात्र, त्यांचा बहुदा मुलावरही विश्वास नसेल. त्यामुळेच ते त्यांच्याकडे चार्ज देत नाही, अशी टिप्पणी चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!