🕒 1 min read
मुंबई : मुंबईविरुद्ध उत्तराखंडच्या सामन्यात मुंबईच्या सुवेद पारकरने धडाकेबाज कामगिरी केली आहे. त्याने या सामन्यात २५२ धावांची दमदार खेळी खेळली. मुंबईचे प्रशिक्षक दिनेश लाड यांना आठवते की, “जेव्हा सुवेद पारकर हा लहान मुलगा बोरिवली येथील त्याच्या शाळेच्या आवारात क्रिकेट खेळण्यासाठी पालकांसह जात असायचा. तेव्हा त्याच्या पालकाकडे त्याला स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल हायस्कूल संघात दाखल करण्याची विनंती केली होती. तो टेनिसबॉल क्रिकेट खेळताना चांगली फलंदाजी करायचा. त्याची बॅट चेंडूच्या रेषेत छान यायची आणि त्याची नजर ही नेहमी चेंडूवर असायची. मला वाटले की आपण या मुलावर काम करू शकतो,” असे लाड म्हणाले. ज्यांनी रोहित शर्मा आणि शार्दुल ठाकूर यांना प्रशिक्षक म्हणून काम केले आहे. २१ वर्षीय पारकरने रणजी उपांत्यपूर्व फेरीत उत्तराखंडविरुद्ध पदार्पणात २५२ धावांची खेळी केली. तेव्हा प्रशिक्षकाला आकर्षित करणार त्याचं कौशल्य आता दिसून येत आहे.
सामन्यात सोमवार आणि मंगळवारी पारकरने खेळपट्टीवर टिकून राहात संघाची धावसंख्या वाढती ठेवली. त्याने संघासाठी मोठी खेळी करण्याची ही कामगिरी करून दाखवली. त्याने खेळलेल्या खेळीत ४५० चेंडूत २५ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश आहे.
स्थानिक अ विभाग स्पर्धेत ४ सामान्यांमध्ये तीन शतके ठोकल्यानंतर पारकरची मुंबई संघात निवड करण्यात आली होती. यामध्ये नाबाद शतकानंतर त्याची मुंबई अंडर-२५ साठी निवड करण्यात आली. ज्यामुळे मुंबईला अंडर-२५ सीके नायडू ट्रॉफी जिंकण्यात मदत झाली. या सामन्यात मुंबईची ६ बाद ५० अशी अवस्था असताना संघ संकटात सापडला होता. तेव्हा त्याने शम्स मुलानीसह १९४ धावांची भागीदारी रचली. मागील खेळलेल्या पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये, त्याने कट, अप्पर-कट आणि सीमर्सविरुद्ध मिड-ऑफची लॉफ्टेड ड्राइव्ह खेळण्यास प्राधान्य दिले आहे. त्याला स्क्वेअर-लेगच्या मागे चेंडू स्वेट करण्यासाठी त्याच्या मनगटावर काम करणे देखील आवडते. त्याला मुंबई संघात पदार्पण करताना भारताचा माजी सलामीवीर डब्ल्यूव्ही रमन यांच्याकडून कॅप मिळाली होती.
A ton on #RanjiTrophy debut! ???? ????
Sit back & relive how Mumbai batter Suved Parkar scored an unbeaten hundred on Day 1 of the #QF2 against Uttarakhand. ???? ???? @Paytm | #MUMvCAU | @MumbaiCricAssoc
Watch ???? ????https://t.co/dgPAEzLbUb pic.twitter.com/Fs34pzXP5f
— BCCI Domestic (@BCCIdomestic) June 6, 2022
काही महिन्यांपूर्वी गोष्टी अतिशय भयानक होत्या. पारकर याचा आत्मविश्वास कमी असतानाचा तो टप्पा लाड यांना आठवतो. “तो एका खराब कामगिरीमधून जात होता जिथे त्याच्यासाठी काहीही होत नव्हते. म्हणून आम्ही मूलभूत गोष्टींवर भर देण्याचा निर्णय घेतला. दररोज दोन तास आम्ही ‘कोन प्रॅक्टिस’ केली. हा एक ड्रिल आहे ज्यामध्ये फलंदाज चेंडू शंकूवर ठेवतो आणि त्याला सरळ मारायचा असतो. हे सर्व त्याला स्वतःहून करावे लागते. यामुळे क्रिकेट खेळातील खेळाडूचा फोकस सुधारतो. त्याने ते सातत्याने केले आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तो कठोर परिश्रम करण्यास तयार नेहमीच तयार असतो. अधिक चांगले कामगिरी करण्यासाठी त्याच्याकडे प्रतिभा आहे. त्याने आजपर्यंत कधीही कशाचीही तक्रार केलेली नाही आणि या धावा त्याच्या प्रामाणिकपणाचे परिणाम आहेत,” असे लाड म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
