अलीपुरद्वार : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सातत्याने भाजपवर हल्लाबोल करत आहेत. या सगळ्यात ममता बॅनर्जींनी पुन्हा एकदा भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. ममता बॅनर्जी यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, राज्याचे विभाजन करण्याचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी आपण तयार आहोत.
ममता बॅनर्जी यांचे हे विधान अशा वेळी आले आहे. जेव्हा भाजपचे काही नेते पश्चिम बंगाल राज्याचे विभाजन करण्याची मागणी करत आहेत. ममता बॅनर्जी यांनी भाजपवर फुटीरतावादाला प्रोत्साहन दिल्याचा आरोपही केला. ममता बॅनर्जी यांनी आपल्या वक्तव्यात म्हटले आहे की, “2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी भाजप राज्यात फुटीरतावादाला चालना देण्याचा प्रयत्न करत आहे. उत्तर बंगालमध्ये सर्व समाजाचे लोक अनेक दशकांपासून एकमेकांसोबत राहत आहेत, मात्र भाजप सातत्याने लोकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे.”
तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी आपल्या भाषणात सांगितले की, लोकसभा निवडणुका जवळ आल्याने भाजप वेगवेगळे मुद्दे उपस्थित करत आहे आणि याच भागात त्यांनी वेगळ्या राज्याची मागणी केली आहे. भाजप सर्व गोरखालँडची मागणी करते तर कधी वेगळ्या उत्तर बंगालची. गरज पडल्यास मी जीव देईन पण पण राज्याचे विभाजन कधीच होऊ देणार नाही.
यापूर्वी ममता बॅनर्जी यांनी केंद्रातील भाजप सरकार भ्रष्ट असल्याचे म्हटले होते. यासोबतच केंद्र सरकार नोटाबंदीसारख्या निर्णयातून देशाची अर्थव्यवस्था बिघडवत असून विरोधकांना शांत करण्यासाठी केंद्रीय एजन्सीचा वापर करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
महत्वाच्या बातम्या :


