Share

“सानिया वहिनीला सांग आम्हाला…”, पाकिस्तानी टेनिसपटूची शोएब मलिककडं ‘अशी’ मागणी; एकदा वाचाच!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिकने भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा (Sania Mirza) सोबत लग्न केले. लग्नानंतरही सानिया मिर्झा भारतातच जास्त वेळ घालवते. आता एका पाकिस्तानी खेळाडूने पती शोएब मलिकला आवाहन केले आहे. सानिया मिर्झाने पाकिस्तानात येऊन आम्हाला कोचिंग द्यावे, असे आवाहन पाकिस्तानची महिला टेनिस स्टार मेहक खोखर हिने केले आहे.

मेहक खोखर (Meheq Khokhar) याने एका व्हिडिओमध्ये म्हटले, ”मी शोएब मलिकला सांगेन की सानिया वहिनीने पाकिस्तान टेनिस संघाला प्रशिक्षण द्यावे, त्याचा आम्हाला खूप फायदा होईल. पुढे अनेक टेनिस स्पर्धा येणार आहेत, ज्यांच्या तयारीसाठी सानिया मिर्झा आम्हाला मदत करू शकते.”

सानिया मिर्झाने नुकतीच टेनिसमधून निवृत्ती घेतली आहे. ती तिचा जास्तीत जास्त वेळ भारतात घालवते. सानिया अधूनमधून पाकिस्तानला भेट देते. अशा स्थितीत मेहकच्या आवाहनाची अंमलबजावणी होण्याची शक्यता नाही. मेहक खोखरची गणना पाकिस्तानच्या अव्वल टेनिसपटूंमध्ये केली जाते. सानिया मिर्झासारख्या ग्लॅमरस अवतारासाठीही मेहक ओळखली जाते. मेहक अनेक टीव्ही शोमध्येही दिसली आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!