Share

दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा लवकरच अडकणार विवाहबंधनात! ओटीटी वर प्रदर्शित होणार लग्नाचा VIDEO

Published On: 

🕒 1 min read

मुंबई :  दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री नयनतारा लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. दिग्दर्शक विग्नेश शिवनला याच्यासोबत ती लग्नगाठ बांधणार आहे. मागच्या सात वर्षांपासून हे दोघे एकमेकांना डेट करत आहेत. हे जोडप येत्या ९ जून रोजी लग्न करणार आहे. एक विशेष बाब म्हणजे यांच्या लग्नसोहळ्याच दिग्दर्शन चित्रपटाप्रमाणे करणार आहेत.

यांच्या लग्नाचा व्हिडीओ ओटीटी प्लॅटफॉर्मला विकला जाणार आहे. नयनतारा आणि विग्नेश तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांना भेट देऊन लग्नाचे आमंत्रण दिले आहे. यांचा लग्नसोहळा चेन्नईतील महाबलीपुरम या ठिकाणी पार पडणार आहे. या लग्नसोहळ्यासाठी अनेक सेलिब्रिटी उपस्थितीत राहणार असल्याची माहिती समोर येत आहे.

मार्च २०२१ मध्ये या दोघांचा साखरपुडा झाला होता. त्यावेळी नयनताराने तिच्या इंस्टाग्रामवरून एक फोटो शेअर केला होता आणि कॅप्शन मध्ये लिहिले होते की, मी माझं आयुष्य तुझ्या हाती सोपवते. ‘नामुन राऊडी धान’या चित्रपटाच्या सेटवर दोघांची पहिल्यांदा भेट झाली होती. हे दोघे २०१५ पासून एकमेकांना डेट करत आहेत.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!