मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवास्थानाबाहेर हनुमान चालीसा पठण करणार असे आव्हान देणाऱ्या नवनीत राणा आणि रवी राणा या दाम्पत्याला न्यायालयाकडून जामीन मिळाला होता. काही अटी आणि शर्थीसह जमीन मंजूर झाला आहे. मात्र न्यायालयाकडून नवनीत राणा आणि रवी राणा या राणा दाम्पत्यावर लादून दिलेल्या अटी आणि शर्थी उल्लंघन झाल्यास, त्यांचा मंजूर झालेला जामीन रद्द होऊ शकतो, असंही न्यायालयाने सांगितलं होतं. आता या प्रकरणी राणा दाम्पत्याला न्यायालयाने नोटीस बजावली आहे.
न्यायालयाने राणा दाम्पत्याला जामीन देताना काही अटी-शर्ती घालून दिल्या होत्या. पण या अटींचे उल्लंघन झाल्याचा दावा करत सरकारी पक्षाने न्यायालयात धाव घेतली होती. सरकारी वकील प्रदीप घरत यांनी ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर सत्र न्यायालयाने राणा दाम्पत्याला नोटीस पाठवली आहे. आम्ही तुमचा जामीन रद्द का करू नये, असे स्पष्टीकरण राणा दाम्पत्याकडून मागवण्यात आले आहे. यावर आता राणा दाम्पत्याकडून काय भूमिका मांडली जाते? हे पाहावे लागणार आहे.
राणा दाम्पत्याला काय दिल्या होत्या अटी?
प्रसारमाध्यमांशी बोलायचे नाही, पोलिस तपासात अडथळे आणायचे नाहीत. घटनेशी संबंधित साक्षीदारांवर कोणत्याही प्रकारे दबाव आणायचा नाही आणि त्यांना प्रलोभने दाखवून त्यांच्यावर प्रभाव टाकायचा नाही. तसेच पुन्हा अशा प्रकारच्या गुन्ह्यात सहभाग घ्यायचा नाही, अशा अटी घालण्यात आल्या होत्या.
महत्वाच्या बातम्या –


