Share

मनसेला महाराष्ट्र दिसतो पण भाजपशासित शेजारचा कर्नाटक का दिसत नाही?; काँग्रेसचा सवाल

Published On: 

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याबाबत आक्रमक भूमिका घेत त्यासमोर हनुमान चालीसा वाजवण्याचे आदेश मनसे सैनिकांना दिले होते. यावरून महाराष्ट्रात बराच गदारोळ चालला. मात्र आता काँग्रेस नेते सचिन सावंत (sachin Sawant) यांनी थेट कर्नाटकातील हनुमान चालीसा प्रकरणावरून मनसेवर निशाणा साधला आहे.

“केवळ मनसेला महाराष्ट्र दिसतो पण भाजपा शासित शेजारचा कर्नाटक का दिसत नाही? श्रीराम सेनेसोबत मनसेने तेथील आंदोलनात सहभागी व्हावे. फडणवीस साहेबांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मईंची हातभर का पायभर फाटली तेही स्पष्ट करावे. मनसे व भाजपा महाराष्ट्र बदनाम करत आहेत हे स्पष्ट आहे.”, असे ट्वीट सचिन सावंत यांनी केले आहे.

दरम्यान आजपासून (९ मे) कर्नाटकमधील एक हजार मंदिरांमध्ये सकाळी पाच वाजता लाऊडस्पीकरवरून हनुमान चालीसा, ओंकार किंवा भक्तीगीते लावण्यात येतील असा इशारा श्रीराम सेनेने दिला आहे. यावरून कर्नाटकमध्येही हनुमान चालीसा वाद चांगलाच रंगल्याचे दिसून येते आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!