Share

IPL 2022 MI vs KKR : मुंबई बदला घेण्यासाठी सज्ज..! वाचा हेड-टू-हेड आकडेवारी का सांगते

Published On: 

मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022)चा ५६वा सामना मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाइट रायडर्स (MI vs KKR) यांच्यात नवी मुंबईतील डी. वाय. पाटील क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. या हंगामात दोन्ही संघांमध्ये एक सामना खेळला गेला, ज्यामध्ये कोलकाता नाइट रायडर्सने मुंबई इंडियन्सचा ५ गडी राखून पराभव केला. मुंबई इंडियन्ससाठी हा मोसम खूपच खराब गेला आहे. संघाने आतापर्यंत एकूण १० सामन्यांपैकी केवळ २ सामने जिंकले आहेत, तर कोलकाताने या हंगामात आतापर्यंत एकूण ११ सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्यांना केवळ ४ विजय मिळवता आले आहेत.

कोलकाता नाइट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स आयपीएलमध्ये एकूण ३० सामन्यांमध्ये एकमेकांसमोर आले आहेत. यामध्ये मुंबईने २२ सामने जिंकले आहेत, तर कोलकाताला केवळ ८ सामन्यांमध्ये विजय मिळवता आला आहे. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सची कोलकाताविरुद्धची सर्वोच्च धावसंख्या २१० आहे. याउलट, कोलकाताची मुंबईविरुद्धची सर्वोच्च धावसंख्या २३२ धावांची आहे.

गेल्या पाच सामन्यांत मुंबईने दोन वेळा तर कोलकाताने तीन सामने जिंकले आहेत. त्यामुळे, हेड-टू-हेड रेकॉर्ड आणि आकडेवारीच्या बाबतीत मुंबई इंडियन्सचा वरचष्मा आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

 

 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!