मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवास्थानाबाहेर हनुमान चालीसा पठण करणार असे आव्हान देणाऱ्या नवनीत राणा आणि रवी राणा या दाम्पत्याला न्यायालयाकडून जामीन मिळाला होता. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना मुंबईतील विशेष न्यायालयाकडून दिलासा मिळाला होता. काही अटी आणि शर्थीसह जमीन मंजूर झाला आहे. मात्र न्यायालयाकडून नवनीत राणा आणि रवी राणा या राणा दाम्पत्यावर लादून दिलेल्या अटी आणि शर्थी उल्लंघन झाल्यास, त्यांचा मंजूर झालेला जामीन रद्द होऊ शकतो, असंही न्यायालयाने सांगितलं होतं.
आता मात्र नवनीत राणा यांना आता लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. राणा यांनी यावेळी शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली. यानंतर शिवसेना नेत्या मनीषा कायंदे यांनी देखील न्यायालयाने घालून दिलेल्या बंधनाचा राणा यांनी उल्लंघन केल्या असल्याचा आरोप केला आहे. आता मुंबई पोलिसांकडून राणा यांच्या वक्तव्याची तपासणी करण्यात येणार आहे. तपासणीनंतर जर त्यात काही आक्षेपार्ह बाबी आढळून आल्या तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. जामीन रद्द करण्याची मागणी करण्यात येईल, असे सरकारी वकील प्रदीप घरात म्हणाले.
राणा दाम्पत्यांना जामीन दिल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधता येणार नाही, अशी अट न्यायालायाने घातली होती. मात्र राणा दाम्पत्याने जामिनावर सुटल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला आहे. आता त्यांच्यावर कारवाई होते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

