मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये आज रविवारी संध्याकाळी साडेसात वाजता दिल्ली कॅपिटल्सचा सामना चेन्नई सुपर किंग्जशी (CSK vs DC) होणार आहे. या मोसमातील उभय संघांमधील हा पहिलाच सामना असेल. मात्र या सामन्यापूर्वीच दिल्ली संघाला मोठा झटका बसला आहे. संघाचा नेट बॉलर कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, नेट बॉलरला कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आल्याने दिल्ली कॅपिटल्सने त्याच्यासोबत हॉटेल रूममध्ये राहणाऱ्या गोलंदाजालाही आयसोलेशनमध्ये पाठवले आहे.
बीसीसीआयने आयपीएलसाठी बनवलेल्या कोरोना प्रोटोकॉल अंतर्गत दिल्ली कॅपिटल्सला कोरोना चाचणीच्या दुसर्या फेरीतून जावे लागेल आणि तोपर्यंत सर्व खेळाडू खोल्यांमध्ये राहतील. नवी मुंबईतील डी. वाय. पाटील क्रिकेट स्टेडियमवर आज संध्याकाळी दिल्ली कॅपिटल्सचा सामना चेन्नई सुपर किंग्जशी होणार आहे. दिल्लीचा संघ गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे. त्यांनी १० पैकी ५ सामने जिंकले. तर चेन्नई सुपर किंग्ज ९व्या स्थानावर आहे.
Delhi Capitals players forced into isolation after net bowler tests positive for COVID-19
— Press Trust of India (@PTI_News) May 8, 2022
दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यातील सामना गेल्या महिन्यात पुण्यात होणार होता. पण नंतर हा सामना मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर हलवण्यात आला. कोरोनाच्या संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी असे करण्यात आले होते. कारण या सामन्यासाठी दोन्ही संघांना प्रवास करावा लागणार होता. अशा स्थितीत उर्वरित खेळाडूंनाही संसर्ग होण्याची शक्यता होती.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

