Share

IPL 2022 PBKS vs RR : लिव्हिंगस्टोननं केला ‘असा’ प्रकार, मग गोलंदाजानं केली अंपायरकडं तक्रार!

Published On: 

मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022)चा ५२वा सामना शनिवारी पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स (PBKS vs RR) यांच्यात खेळला गेला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रंगलेल्या या सामन्यात पंजाबने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत १८९/५ धावा केल्या. प्रत्युत्तरात राजस्थान रॉयल्सने १९.४ षटकांत ४ गडी गमावून लक्ष्याचा पाठलाग केला.

या सामन्यादरम्यान एक घटना घडली, ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पंजाबचा फलंदाज लियाम लिव्हिंगस्टोनने क्रीजच्या ऑफसाईडला येत फलंदाजीचा स्टान्स घेण्याचा प्रयत्न केला त्यामुळे राजस्थान रॉयल्सचा वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णाने पंचांकडे तक्रार केली. लिव्हिंगस्टोन ऑफ-स्टंपच्या अगदी बाहेर उभा राहिला आणि लोकांना तो काय करणार आहे असा प्रश्न पडला. मात्र, यावर कृष्णाला राग आला आणि त्याने पंचांशी बोलण्यास सुरुवात केली.

https://twitter.com/Rahulc7official/status/1522906221535137793

पंचांशी कृष्णाचे झालेले संभाषण ऐकू आले नाही, परंतु त्याच षटकातील शेवटच्या चेंडूवर कृष्णाने लिव्हिंगस्टोनला क्लीन बोल्ड केले. कृष्णाने अचूक यॉर्कर मारल्याने ऑफ-स्टंपच्या बाहेर उभे राहणे लिव्हिंगस्टोनला महागात पडले. लिव्हिंगस्टोनने १४ चेंडूत १ चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने २२ धावा केल्या.

असा रंगला सामना…

आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये ५२व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने कमबॅक करत पंजाब किंग्जवर (PBKS vs RR) ६ गड्यांनी विजय मिळवला. वानखेडे स्टेडियमवर रंगलेल्या या सामन्यात पंजाबने राजस्थानला १९० धावांचे आव्हान दिले. पंजाबचा कप्तान मयंक अग्रवालने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीवीर फलंदाज जॉनी बेअरस्टोने अर्धशतक ठोकले तर जितेश शर्माने फिनिशरची भूमिका बजावली. प्रत्युत्तरात संघात कमबॅक केलेल्या मुंबईकर यशस्वी जयस्वालच्या अर्धशतकाच्या जोरावर राजस्थानने २ चेंडू शिल्लक ठेवून विजयावर शिक्कामोर्तब केले.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!