Share

“… तर प्रभू श्रीरामाचा आशीर्वाद मिळणार नाही”- संजय राऊत

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्यातील नेत्यांना सध्या अयोध्या दौऱ्याचे वेध लागले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे ५ जून रोजी अयोध्येला जाणार आहेत तर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे देखील १० जूनला अयोध्या दौरा करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. यावरून देखील राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोप होत आहेत. आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यावर  प्रतिक्रिया दिली असून टीका करणाऱ्यांना अप्रत्यक्षरीत्या टोला लगावला.

तुम्ही जर राजकीय हेतूने अयोध्या दौरा करत असाल तर तुम्हाला प्रभू श्रीरामाचा आशीर्वाद मिळणार नाही असा टोला विरोधकांना संजय राऊत यांनी लगावला. तसेच मंत्री आदित्य ठाकरे यांचा हा दौरा राजकीय नसल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं आहे. आदित्य ठाकरे १० जूनला अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. प्रभू श्रीराम देशातील सर्वांचे आहेत. अयोध्येत किंवा उत्तर प्रदेशात असली नकली बॅनर कुणी लावले माहिती नाही. उत्तर प्रदेशची जनता सुजाण आहे. आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यासाठी आमची तारीख १० जून ठरतेय,असं संजय राऊत म्हणाले. आदित्य टाकरेंच्या अयोध्या दौऱ्याची तयारी सुरु असल्याची माहिती देखील संजय राऊत यांनी दिली आहे.

मात्र या दौऱ्यात शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी देखील सामील होणार असल्याने हा दौरा राजकीयच असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून होत आहे.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!