Share

“त्यांच्या सुसंस्कृतपणाचा मला अभिमान…”; सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे कौतुक

Published On: 

🕒 1 min read

पुणे : सध्या राज्यात हनुमान चालीसा आणि अजानवरून वाद सुरु असताना पाहायला मिळत आहेत. यावर सुप्रिया सुळे यांना प्रतिक्रिया विचारली असता, सध्या माझ्या लोकसभा मतदारसंघाच्या जबाबदाऱ्या, महागाई आणि कोविडचे आव्हान आहे. एवढे मोठे प्रश्न सोडून बाकीच्या विषयांची मला फारशी माहिती नसते. पुरोगामी महाराष्ट्रात हनुमान चालीसाच्या प्रश्नाने सर्वसामान्यांचे विषय सुटणार आहेत का? असा प्रश्न सुप्रिया सुळे यांनी यावर प्रतिक्रिया देताना उपस्थितीत केला आहे.

मुंबईत नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या राजकारणावरून वातावरण तापले आहे. तर दुसरीकडे राज ठाकरे यांच्या हनुमान चालीसावरून वाद सुरु आहेत. पण अशा राजकारणातून सर्वसामान्यांचे प्रश्न सुटणार आहेत का असे स्पष्ट वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केले आहे. तसेच यासह राज्यातले वातावरण दुषित होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

तसेच पुढे बोलताना सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कौतुक केले. म्हणाल्या, राज्याचे मुख्यमंत्री किती सुसंस्कृत आहेत. त्यांनी एक शब्दही काढला नाही. त्यांनी आपला सुसंस्कृपणा दाखवला. त्यांच्यावर किती हल्ले झाले तरी त्यांनी आपले मराठी आणि भारतीय  संस्कार शाबूत ठेवले. याचे मला कौतुक आणि अभिमान वाटतो. यासह लोक त्यांना पाहिजे ते करतात, बोलतात. आपण संविधानाच्या चौकटीत राहिले पाहिजे. आत्मचिंतन सातत्याने केले पाहिजे. लोकांच्या सेवेसाठी मी राजकारणात आले, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

महत्वाच्या बातम्या – 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!