आज खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा पठण करणार आहेत. त्यामुळे मातोश्री बाहेर जमा झालेले शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. या पार्श्वभूमीवर काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त देखील लावण्यात आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका करत हे सरकार आणि पोलीस स्पॉन्सर्ड आहेत असा आरोप केला होता.
त्यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर देत केंद्र सरकार आणि केंद्रीय पोलीस दल पण स्पॉन्सर्ड आहेत असा प्रत्यारोप केलाय.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
