Share

“शिवसेना पूर्णपणे ट्रॅपमध्ये फसत चालली…”; संदीप देशपांडेंचं ट्वीट

Published On: 

मुंबई : मुंबईत दाखल झालेल्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्याविरोधात शिवसैनिक आक्रमक झाल्याने राजकीय वातावरण सध्या चांगलच तापले आहे. शिवसेना कार्यकर्त्यांनी थेट राणा दाम्पत्य राहत असलेल्या ठिकाणी धडक दिली. यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पाश्वर्भूमीवर मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी एक ट्वीट करत शिवसेना ट्रॅपमध्ये अडकत असल्याचे म्हटले आहे.

“शिवसेना पूर्णपणे ट्रॅप मध्ये फसत चालली आहे, एका महिन्यात दोन खासदारांच्या घरावर हल्ला झाला आहे. स्वतःहून राष्ट्रपती राजवटीचा मार्ग तयार करत आहेत,’ असं संदीप देशपांडे यांनी ट्वीट केले आहे.

शरद पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी केलेलं आक्रमक आंदोलन तसेच भाजप नेते मोहित कंबोज यांच्या गाडीवर मातोश्री परिसरात करण्यात आलेला हल्ला आणि अशा घटनांमुळे राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला आहे, असा आरोप भाजपकडून करण्यात येत आहे.

तसेच भाजपच्या काही नेत्यांनी तर थेट केंद्र सरकारकडे राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर राणा दाम्पत्याच्या निमित्ताने मुंबईत झालेल्या राड्याचा धागा पकडत मनसेच्या संदीप देशपांडे यांनी शिवसेना ट्रॅपमध्ये अडकत चालली आहे असे म्हंटले आहे.

 महत्वाच्या बातम्या –

 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!