नाशिक : मातोश्रीवर येऊन हनुमान चालीसा म्हणण्याचा इशारा देण्याऱ्या नवनीत राणा व रवी राणा या दाम्पत्याला राज्याचे मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी आपल्या खास शैलीत चांगलेच फटकारले आहे. तुम्हाला हनुमान चालीसा वाचायचे असेल तर तुमच्या घरात वाचा. दुसऱ्यांच्या घरात जायची काय गरज? खाजवून खरूज कशाला काढत आहात? शिवसेना’ला कशाला खिजवता ?
तुमच्या या चिथावणीमुळे शिवसैनिक आक्रमक होत आहेत. ते ही महाप्रसाद देण्याची वाट पाहत आहेत. त्यांच्या महाप्रसादात बुक्कांबा, लाथाटकी आणि बुक्काकोट असतो. त्यामुळे शांततेनं घ्या. असं छगन भुजबळ यांनी म्हंटले आहे. राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडल्याचे चित्र निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. राज्यातील जनता हे सर्व पाहत असून, राणा दाम्पत्याचा बोलविता धनी वेगळाच आहे, असा दावा भुजबळ यांनी केला आहे.
आपल्या घरात हनुमान चालीसा वाचा, मुंबई आणि अमरावतीत बजरंग बलीची अनेक मंदिरे आहेत. मातोश्री बाहेर हनुमान चालीसा वाचण्याला काय अर्थ ? तुमच्यामुळे शिवसैनिक आक्रमक होत आहेत. आम्ही राणा दाम्पत्याची वाट पाहतोय असं म्हणत आहेत. राणा दाम्पत्याला महाप्रसाद द्यायचा आहे, असे सांगत आहेत. आरती, पठण झालं की महाप्रसाद द्यावा लागतो, असंही ते सांगत आहेत. मी एकाला फोन केला. कसला महाप्रसाद रे ? तो म्हणाला, लाथापेटी आहे. बुक्कांबा आहे. असे वेगवेगळे पदार्थ आहेत. या महाप्रसादाचा त्यात समावेश आहे. राणा दाम्पत्य आले की त्यांना महाप्रसाद द्यायचा आहे.
मी त्यांना म्हंटलं. “अरे जरा शांततेनं घ्या. प्रसादही शांततेनं द्या”
महत्वाच्या बातम्या :

