Share

भारत-पाकिस्तान सामने होणार? राजांच्या प्रस्तावावर ICCनं सुनावला ‘असा’ निर्णय!

Published On: 

मुंबई : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) अध्यक्ष रमीझ राजा यांचा चार देशांच्या स्पर्धेचा प्रस्ताव आयसीसीने फेटाळला आहे. त्यामुळे आता भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना होण्याची शक्यताही आता संपुष्टात आली आहे. त्याचवेळी, आणखी एक घडामोड म्हणजे बीसीसीआयचे सचिव जय शाह यांचा आयसीसी क्रिकेट समितीमध्ये समावेश करण्यात आला आहे.

आयसीसीच्या दोन दिवसीय बैठकीचा रविवारी दुबईत समारोप झाला. या काळात अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. रमीझ राजा यांचा प्रस्ताव सर्व मंडळांनी फेटाळला. राजा यांनी सांगितले होते, की ते चार देशांच्या स्पर्धेचे आयोजन करण्याचा विचार करत आहेत ज्यामध्ये भारतीय संघाचाही समावेश करण्याची योजना आहे. पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या इतर तीन देशांचाही विचार करण्यात आला आहे.

आता या नकारामुळे पाकिस्तान बोर्डाला मोठा फटका बसला आहे. आयसीसी स्पर्धांमध्ये भारत-पाकिस्तान सतत एकमेकांविरुद्ध खेळत आहेत. गेल्या वर्षी यूएईमध्ये झालेल्या टी-२० विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना झाला होता, ज्यात पाकिस्तानने बाजी मारली होती. विश्वचषकाच्या इतिहासात पाकिस्तान संघाने प्रथमच टीम इंडियाचा पराभव केला.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!