मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. म्हणाले, शरद पवारांच्या घरावरील हल्ला निंदनीय असून या हल्ल्यास उद्धव ठाकरे सरकार जबाबदार आहे.
त्यांनी पुण्यात एका कार्यक्रमासाठी आले असता प्रसार माध्यमांशी बोलताना ही भूमिका मांडली. यावेळी रामदास आठवले म्हणाले, राज्य सरकारने एसटी कामगारांच्या भावनेचा विचार करायला हवा. त्यांच्या मागण्या मान्य कराव्या, मागील कित्येक महिन्यापासून आंदोलन सुरू आहे. या आंदोलनामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे.
मात्र एसटी कामगारांच्या भावनांचा विचार न केल्याने त्यांचा उद्रेक झाला, अशा प्रकारचा हल्ला करणे योग्य नाही. ही घटना निंदनीय असल्याचे आठवले म्हणाले. शरद पवार यांच्या घरी हल्ल्याबाबत पोलिसांना माहिती नव्हती का? असा सवाल उपस्थित करत उद्धव ठाकरे सरकारच या हल्ल्यास जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या –
राज्य सरकारचे मोठे धोरण; सोयाबीन, कापसाचे उत्पादन वाढणार!
“तू आधी माझ्याशी…” ; राज ठाकरेंचा वसंत मोरेंना आजच्या भेटीत सवाल
“ईडीच्या एका नोटीसमुळे…”; छगन भुजबळांचा राज ठाकरेंना खोचक टोला
IPL 2022 : युझवेंद्र चहलचा कहर..! लखनऊविरुद्धच्या सामन्यात रचला ‘नवा’ रेकॉर्ड; वाचा!
“इश्क़ में हम तुम्हे क्या बताये…”, मोहित कंबोज यांचा मुख्यमंत्री ठाकरेंवर निशाणा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

