मुंबई : भारताचा माजी यष्टीरक्षक फलंदाज पार्थिव पटेलने आयपीएल २०२२ मधील चेन्नई सुपर किंग्जच्या सलग चौथ्या पराभवाबाबत धक्कादायक विधान केले आहे. तो म्हणाला, की सीएसकेला काहीतरी वेगळे करण्याची गरज आहे आणि म्हणूनच महेंद्रसिंह धोनीने आता संघासाठी सलामी दिली पाहिजे.
चेन्नई सुपर किंग्जला शनिवारी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध आठ गडी राखून पराभव पत्करावा लागला आणि चालू हंगामातील हा संघाचा चौथा पराभव ठरला. या पराभवासह संघ गुणतालिकेत तळाला पोहोचला आहे. आयपीएलच्या इतिहासात चेन्नई सुपर किंग्जने पहिले चार सामने गमावण्याची ही पहिलीच वेळ आहे.
क्रिकबझवरील संभाषणादरम्यान, पार्थिव म्हणाला, “धोनी हा एक असा खेळाडू आहे ज्याने अनेक वर्षांपासून चेन्नई सुपर किंग्जला अनेक संकटातानू बाहेर काढले आहे. त्याने आपल्या कारकिर्दीची सुरुवात सलामीवीर म्हणून केली होती आणि जेव्हा तो त्याच्या कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यावर आहे, तेव्हा तो पुन्हा सलामी का देत नाही? तो आता सातव्या क्रमांकावर फलंदाजी करतो आणि त्याला १०-१५ चेंडू खेळायला येतात. जर त्याने १४-१५ षटके फलंदाजी केली तर तो खूप काही करू शकतो. काहीतरी वेगळे करावे लागेल.”
महत्त्वाच्या बातम्या –
- …असे व्हिडिओ फॉरवर्ड करणे हा सुद्धा गुन्हा आहे- तृप्ती देसाई
- “काश्मीर फाईल्स’ थांबवण्यासाठी हातात तलवारी घ्या”; साध्वी सरस्वती
- IPL 2022 : अश्विन फलंदाजी करताना अचानक मैदानाबाहेर गेला आणि इतिहास घडला! वाचा नक्की झालं काय!
- संजय राऊत किरीट सोमय्यांना शोधून काढतील – छगन भुजबळ
- राज्य सरकारचे मोठे धोरण; सोयाबीन, कापसाचे उत्पादन वाढणार!
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com


