मुंबई : औरंगाबाद जिल्ह्यातील एक धक्कादायक प्रकार समोर आला असून गेली अनेक वर्षे पंचक्रोशीत कीर्तनकार म्हणून प्रसिद्ध असलेले वैजापूर तालुक्यातील ४८ वर्षीय महाराज आणि सिल्लोड तालुक्यातील ४० वर्षीय महिला यांचा एक अश्लील व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. दरम्यान, याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई (Trupti Desai) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच असे अश्लील व्हिडिओ फॉरवर्ड करणे हा सुद्धा गुन्हा आहे, असेही देसाई म्हणाल्या आहेत.
यासंदर्भात तृप्ती देसाई यांनी फेसबुक पोस्ट शेअर केली असून त्या म्हणाल्या आहेत की,‘कीर्तनकारांचा संभोग करतानाचा व्हायरल झालेला व्हिडिओ कृपया कोणीही फॉरवर्ड करू नये, मोबाईलमध्ये असेल तर डिलीट करावा. तो व्हिडीओ पूर्णपणे स्पष्ट असल्यामुळे या दोन्ही कीर्तनकारांची मोठ्या प्रमाणावर बदनामी होत आहे, कृपया ती थांबवा.’
दरम्यान, पुढे त्या म्हणाल्या की,‘अश्लील व्हिडिओ फॉरवर्ड करणे हा सुद्धा गुन्हा आहे आणि हे अश्लीलचाळे पाहणे म्हणजे विकृती आहे. त्याऐवजी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी करा.’
महत्त्वाच्या बातम्या –
- संजय राऊत किरीट सोमय्यांना शोधून काढतील – छगन भुजबळ
- IPL 2022 : अश्विन फलंदाजी करताना अचानक मैदानाबाहेर गेला आणि इतिहास घडला! वाचा नक्की झालं काय!
- “काश्मीर फाईल्स थांबवण्यासाठी हातात तलवारी घ्या”; साध्वी सरस्वती
- राज ठाकरेंच्या भेटीनंतर वसंत मोरेंची पहिली प्रतिक्रिया! म्हणाले, “मी शेवटपर्यंत…”
- राज्य सरकारचे मोठे धोरण; सोयाबीन, कापसाचे उत्पादन वाढणार!


