🕒 1 min read
ICC Award 2022 | टीम महाराष्ट्र देशा: आयसीसी (ICC) ने पुरुषांच्या ‘इमर्जिंग क्रिकेटर ऑफ द इयर 2022’ पुरस्कारासाठी नामांकन जाहीर केली आहे. या नामांकन यादीमध्ये भारतीय संघातील एकाच गोलंदाजाला स्थान मिळू शकले आहे. टीम इंडियातील युवा गोलंदाज अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) चे या यादीमध्ये नाव आहे. या पुरस्कारासाठी अर्शदीप दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज मार्को जॉनसेन, अफगाणिस्तानचा फलंदाज इब्राहिम झाद्रान आणि न्यूझीलंडचा सलामीवीर फिन ॲलन यांच्यासोबत स्पर्धा करणार आहे.
या पुरस्कारांसाठी जानेवारीपासून मतदान सुरू होईल, असे आयसीसीने जाहीर प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करून अर्शदीपला सहा महिन्यापेक्षा कमी कालावधी झाला आहे. दरम्यान, त्याला या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. त्याने आतापर्यंत 21 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहे. या सामन्यांमध्ये त्याने 33 विकेट्स घेतल्या आहेत.
Two left-arm quick phenoms, two game-changing openers ????
The four players eying the ICC Men's Emerging Cricketer of the Year award for 2022 ????#ICCAwardshttps://t.co/1w54odaZiG
— ICC (@ICC) December 29, 2022
न्यूझीलंड दौऱ्यावर अर्शदीपने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अर्शदीपने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्याने मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर पाकिस्तान विरुद्धच्या टी-20 विश्वचषक सामन्यामध्ये उत्तम प्रदर्शन केले होते. या सामन्यामध्ये त्याने आपल्या कौशल्याने पाकिस्तानचे दोन्ही सलामीवीर बाबर आझम आणि रिझवानला बाद केले होते.
टी-20 विश्वचषकामध्ये पाकिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यामध्ये अर्शदीपने 32 धावा देत 3 बळी घेतले होते. या पुरस्कारासाठी अर्शदीप दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज मार्को जॉनसेन, अफगाणिस्तानचा फलंदाज इब्राहिम झाद्रान आणि न्यूझीलंडचा सलामीवीर फिन ॲलन यांच्यासोबत स्पर्धा करणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- Health Care | सर्दी-खोकल्यावर रामबाण उपाय आहे जायफळ, कसा करायचा वापर? जाणून घ्या
- Toyota Innova Hycross | टोयोटाने सादर केली नवीन ‘इनोव्हा हायक्रॉस’ MPV कार, जाणून घ्या फीचर्स
- IND vs SL | निवडकर्त्यांच्या निर्णयामुळे ‘या’ खेळाडूचा टी-20 प्रवास थांबणार?
- Weather Update | कुठे थंडी तर कुठे पाऊस, वाचा हवामान अंदाज
- Sanjay Raut | पुतीन, बायडेन, चार्ल्स, झेलेन्स्की यांच्याकडून उद्धव ठाकरे कोण विचारणा ; संजय राऊतांचा दावा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
