मुंबई : आरोग्य भरती घोटाळा, पेपर फुटी प्रकरण समोर आल्यानंतर विरोधकांनी आणि विद्यार्थ्यांनी महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका केली होती. त्यानंतर राज्यातील म्हाडाच्या परिक्षा ऐनवेळी रद्द झाल्याने पुन्हा एकदा राज्य सरकारचा ढिसाळ कारभार समोर आला. असे असतांनाच एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या मल्हारी नामदेव बारवकर या विद्यार्थ्याने नैराश्यापोटी आत्महत्या केली आहे, याच पार्श्वभूमीवर भाजप नेते अतुल भातखळकर(Atul Bhatkhalkar) यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.
यासंदर्भात भातखळकरांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,’पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील देऊळगाव गाडा येथील एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या मल्हारी नामदेव बारवकर या विद्यार्थ्याने नैराश्यापोटी आत्महत्या केली आहे.परीक्षा रद्द करणे, पेपर फुटी, दलालांचा सुळसुळाट; हे नाकर्ते खंडणी सरकार अजून किती विद्यार्थ्यांचा बळी घेणार आहे?’, असा सवालही त्यांनी केला आहे.
पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील देऊळगाव गाडा येथील एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या मल्हारी नामदेव बारवकर या विद्यार्थ्याने नैराश्यापोटी आत्महत्या केली आहे.
परीक्षा रद्द करणे, पेपर फुटी, दलालांचा सुळसुळाट; हे नाकर्ते खंडणी सरकार अजून किती विद्यार्थ्यांचा बळी घेणार आहे? pic.twitter.com/q9hpnt2NwN— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) December 18, 2021
दरम्यान, मल्हारी हा एमपीएससीच्या पूर्व परीक्षेची तयारी करत होता, यापूर्वी मल्हारीने दोन ते तीन वेळा पूर्व परीक्षा दिली होती, परंतु त्यामध्ये त्याला यश आले नाही. यामुळे नैराश्यात गेलेल्या मल्हारी बारवकर याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
महत्त्वाच्या बातम्या
- महाराष्ट्र ‘हे’ कदापि सहन करणार नाही; काँग्रेसचा इशारा
- इंदिरा गांधींचे नाव घ्यायला भय वाटते की लाज वाटते?
- ‘रस्त्यावरच्या आणि न्यायालयातल्या दोन्ही लढ्यांत विजय मिळेपर्यंत महाराष्ट्र स्वस्थ बसणार नाही’
- ‘एकटा कर्मदरिद्री खासदार विनायक राऊत सोडला तर…’, निलेश राणेंचा हल्लाबोल
- …तर देशात दिवसाला १४ लाख कोरोना रुग्ण सापडतील- व्ही. के. पॉल


