Share

‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना छोटी गोष्ट’; ‘या’ मुख्यमंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य

Published On: 

बंगळुरू : बंगळुर येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या मूर्तीची विटंबना केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. काही समाजकंटकांनी गुरुवारी रात्री महाराजांच्या मूर्तीवर काळा रंग ओतला. या घटनेमुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. आता यातच काही अज्ञातांकडून क्रांतीवीर संगोळी रायण्णा (revolutionary Sangoli Rayanna) यांच्या पुतळ्याचीही विटंबना झाल्याची माहिती समोर येत आहे.

कर्नाटकचे (Karnatak) मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chatrapati Shivaji Maharaj) पुतळ्याच्या विटंबनेवर धक्कादायक वक्तव्य केले आहे.
विटंबना ही छोटी गोष्ट आहे, असे वक्तव्य बसवराज बोम्मई यांनी केल्याने आता शिवप्रेमी अधिकच संपातले आहेत.

महाराष्ट्रभरातून कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्याविरोधात संताप व्यक्त केला जातो आहे. ‘रातोरात महाराष्ट्र एकीकरण समितीने जे केले, त्याचा आम्ही निषेध करतो. कुणीही कायद्याविरोधात गेले, तर कारवाई ही होणारच. गृहमंत्र्यांना तसे कारवाईचे आदेशही देण्यात आले आहेत. छोट्या-मोठ्या घटनेसाठी सावर्जनिक मालमत्तेचे नुकसान सहन केले जाणार नाही’, असे बसवराज बोम्मई यांनी केले आहे.

कर्नाटकच्या बंगळुरूमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याचा व्हिडिओ शुक्रवारी रात्री व्हायरल (Viral Video) झाला होता. विटंबना केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात शिवप्रेमी रस्त्यावर उतरले आणि त्यांनी कानडी व्यावसायिकांना दुकाने बंद करण्यास सुरुवात केली होती.

या वादावर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया देत, छत्रपतींच्या पुतळ्याची विटंबना ही छोटी गोष्ट आहे, अशा अर्थाचं वक्तव्य केल्यानं हा वाद आता आणखी ताणला जाण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!