मुंबई : केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शहा(Amit Shah) हे आज(१८ डिसें.) महाराष्ट्र दौऱ्यावर असून शिर्डीत साईबाबांचे दर्शन घेऊन ते या दौऱ्याला सुरुवात करणार आहेत. त्यानंतर ते प्रवरानगरमधील देशातल्या पहिल्या सहकारी परिषद आणि शेतकरी मेळाव्याला हजेरी लावतील. या मेळाव्याला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे(Raosaheb Danve), केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड(Bhagavat Karad), चंद्रकांत पाटील(Chandrakant Patil), राधाकृष्ण विखे पाटील(Radhakrushn Vikhe Patil) यांची उपस्थिती असेल. दरम्यान, अमित शहा यांच्या दौऱ्याविषयी फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे.
यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधतांना फडणवीस म्हणाले की,’देशात सहकार मंत्रालय पहिल्यांदा तयार झाले. १०० वर्षांपेक्षा जास्त सहकारचा इतिहास आहे. परंतु देशात सहकारासाठी वेगळं मंत्रालय नव्हतं. पहिल्यांदा मोदींनी सहकार मंत्रालय केलं’, असे फडणवीस म्हणाले.
दरम्यान, पुढे ते म्हणाले की,’ज्यांना सहकारातला अनुभव आहे, त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या खात्याचे मंत्री केले आहे. आज सहकाराची भूमी असलेल्या महाराष्ट्रात सहकार परिषद घेऊन सहकारातील अडचणी दूर करण्यासाठी अमित शाह इथे येत आहेत.’ तसेच साई बाबांना खरंतर काही मागायचे नसते बाबांना सगळं माहिती आहे. जे योग्य आहे तेच बाबा करतील’, असेही फडणवीस म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- महाराष्ट्र ‘हे’ कदापि सहन करणार नाही; काँग्रेसचा इशारा
- इंदिरा गांधींचे नाव घ्यायला भय वाटते की लाज वाटते?
- अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी महाराष्ट्र राज्य शासन कटिबद्ध- नवाब मलिक’
- ‘एकटा कर्मदरिद्री खासदार विनायक राऊत सोडला तर…’, निलेश राणेंचा हल्लाबोल
- …तर देशात दिवसाला १४ लाख कोरोना रुग्ण सापडतील- व्ही. के. पॉल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

