Share

भातखळकरांच्या ‘त्या’ टीकेवर सचिन सावंत यांचे प्रत्युत्तर; म्हणाले, ‘इंग्रजांचे पाय…’

Published On: 

मुंबई : चंद्रपुरातल्या गोंडपिंपरी येथे निवडणुकीच्या प्रचारार्थ बोलत असतांना काँग्रेस नेते तथा मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar)यांनी ‘आज जे दिल्लीच्या तख्तावर बसलेत ते स्वातंत्र्य संग्राम सुरु असताना इंग्रजांचे पाय चाटत होते’,अशी टीका भाजपवर केली होती. त्यांच्या या वक्तव्यावर भाजप नेते अतुल भातखळकर(Atul Bhatkhalkar) यांनी जहरी ट्वीट करत प्रतिसवाल केला आहे.

‘इंग्रजांनी देश सोडताना देशाची सत्ता पाय चाटणाऱ्यांच्याऐवजी काँग्रेसच्या हाती का दिली? याचे उत्तर वडेट्टीवार यांनी द्यावे. काँग्रेस आणि ब्रिटिशांच्या साट्यालोट्याचा इतिहास फार काळ दबून राहणार नाही.’ असे ट्वीट करत अतुल भातखळकर यांनी विजय वडेट्टीवार यांना आवाहन दिले आहे.

दरम्यान, भातखळकरांच्या या टीकेवर काँग्रेस नेते सचिन सावंत(Sachin Sawant) यांनी प्रत्युत्तर दिले असून यासंदर्भात ट्विट करत ते म्हणाले आहेत की,’इंग्रजांचे पाय चाटणारे’ ही ओळख स्वतः मान्य केली हे चांगले झाले! स्वातंत्र्य सैनिकांना पकडून देणारे इंग्रजांचे एजंट उलट्या बोंबा मारत आहेत. त्यांच्या माहितीसाठी- १९४६ ला देशात निवडणूका होऊन १५८५ पैकी ९२३ जागा जिंकल्याने बहुमताने काँग्रेसकडे जनतेने जबाबदारी सोपवली होती’, असे सावंत म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!