मुंबई : राज्यातील एसटी कर्मचारी एसटीचा संप मागे घेण्यास तयार नसून ते विलीणीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी एसटी कर्मचाऱ्यांना इशारा दिला आहे. परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी आतापर्यंत अनेकदा मूभा दिली. मात्र एसटी कर्मचाऱ्यांनी आता सहनशीलता संपवली आहे. सहनशीलतेचा अंत पाहू नये, उद्या जर मेस्मा कायद्यासंदर्भात (अत्यावश्यक सेवा कायदा Mesma Act) निर्णय घेतला तर? असा सवाल अजित पवारांनी केला आहे.
अजित पवार पुढे म्हणाले, एसटी कर्मचाऱ्यांना माझी कळकळीची विनंती आहे, आता कामावर येऊन सुरुवात केली पाहिजे. एसटी चालवताना काही कर्मचाऱ्यांवर दगडफेक केली जाते. एसटीचे नुकसान झाले तर ते जनतेचच नुकसान आहे. त्यातून कोण काय मिळवतं? असा सवाल अजित पवार यांनी केला आहे.
पुढे अजित पवार म्हणाले, उद्या मेस्मा कायद्यासंदर्भात काही निर्णय घेतला किंवा टोकाचा निर्णय घेऊन तुटेपर्यंत ताणले तर मागच्या काळामध्ये काय अवस्था झाली हे आपण बघितले. जर कुणी ऐकायला तयार नसेल आणि नविन भरती सुरु केली तर नोकरीचा प्रश्न येणार आहे. याबद्दल पण मंत्रीमंडळात चर्चा झाली आहे. इथपर्यंत टोकाची वेळ येऊ नये अशी माझी एसटी कर्मचाऱ्यांना विनंती आहे.
एसटी कर्मचाऱ्यांचे मानधन बऱ्यापैकी वाढवण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांना पगार कमी होता पण मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आणि निर्णय देण्यात आला. त्यामुळे आता एसटी कर्मचाऱ्यांनी संमजसपणे भूमिका घ्यावी. आपण महाराष्ट्रातील एका परिवारातील आहोत, असेही पवार म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन अभावी युपीत एकही मृत्यू नाही; योगी सरकारचा दावा
- ‘थकबाकीचा डोंगर वाढतोय, राज्याच्या हक्काचे पैसे मिळायलाच पाहिजे’, शिवसेनेचा केंद्राला इशारा
- बाहेरच्या बाहेर खंडणीचा निधी मिळत असेल तर सरकारी निधीची गरज काय?
- महाविकास आघाडी सरकारमध्ये राष्ट्रवादीच्या खात्यांना सर्वाधिक निधी
- केंद्रातील भाजपा व संघांचा आरक्षण संपवण्याचा डाव-नवाब मलिक


