मुंबई : दक्षिण आफ्रिकेचा महान फलंदाज डेव्हिड मिलरने भारताविरुद्धच्या टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात चमकदार कामगिरी केली. त्याने ६४ धावांची नाबाद खेळी खेळली. सामन्यात मिलरने झंझावाती कामगिरी करत संघाला विजय मिळवून दिला. मिलर आज (१० जून) त्याचा ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे. यावेळी राजस्थान रॉयल्सने त्याला मनोरंजक पद्धतीने शुभेच्छा दिल्या. राजस्थानने मिलरचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. चाहतेही या व्हिडिओवर मोकळ्या मनाने प्रतिक्रिया देत आहेत.
मिलर आयपीएल २०२१ मध्ये राजस्थान रॉयल्सचा भाग होता. पण आयपीएल २०२२ च्या लिलावात त्याला गुजरात टायटन्सने ३ कोटी रुपयांना विकत घेतले होते. त्याच्या वाढदिवसानिमित्त राजस्थानने मिलरला मनोरंजक पद्धतीने शुभेच्छा दिल्या. राजस्थानने मिलरचा एक जुना व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो जोस बटलरच्या फलंदाजी शैलीची नक्कल करत आहे. या व्हिडिओला चाहत्यांची ट्विटरवर खूप पसंती मिळत आहे. ट्विटरवर एक लाखाहून अधिक लोकांनी ते पाहिले आहे. तर सुमारे ८ हजार लोकांनी त्याला लाईक केले आहे.
Happy birthday, Killer Miller. ????????#RoyalsFamily | @DavidMillerSA12 pic.twitter.com/gotrxzBIMr
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) June 10, 2022
भारताविरुद्ध सुरू असलेल्या टी-२० मालिकेत मिलर दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा भाग आहे. दिल्ली येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात त्याने तुफानी कामगिरी केली आहे. यापूर्वी त्याने आयपीएलमध्येही आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. मिलरने आयपीएलच्या १०५ सामन्यांमध्ये २४५५ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने १ शतक आणि १२ अर्धशतके झळकावली आहेत. मिलरची आयपीएलमधील सर्वोत्तम धावसंख्या १०१ धावा आहे.
महत्वाच्या बातम्या:


