अकोला: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी काल (१२ एप्रिल) ठाण्यात उत्तर सभा घेतली. यावेळी त्यांनी मशिदीवरील भोंगे बाबत ठाकरे सरकारला अल्टीमेटम दिला. तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर निशाणा साधत जोरदार हल्ला चढवला. यावरच आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“राज ठाकरे यांची भूमिका ही दंगल घडविणारी आहे. जिथे-जिथे मंदिर आहे त्या मंदिरांच्या वर भोंगे लावून हनुमान चालीसा पठण करण्यात काही हरकत नाही. मात्र मस्जिद समोर भोंगे लावून हनुमान चालीसा वाजविणे हे दंगल घडविण्यासाठी प्रवृत्त करण्याची भूमिका राज ठाकरे घेत आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे त्यांच्यावर आयपीसी 153 अन्वये कारवाई होऊ शकते. राज्य सरकार कारवाई का करीत नाही हे कळण्यापलीकडे आहे.”, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.
काय म्हणाले राज ठाकरे?
3 तारखेला ईद आहे. माझी राज्य सरकारला, गृह खात्याला विनंती आहे की, कुठेही तेढ, दंगल आम्हाला निर्माण करायच्या नाहीत. मला तशी इच्छा देखील नाही. महाराष्ट्राचं स्वास्थ आम्हाला बिघडवायचं नाही. पण आज 12 तारीख आहे. 12 ते 3 मे महाराष्ट्रातील सर्व मशिदींमधील मौलवींना तुम्ही बोलवून घ्या त्यांना सांगा सर्व मशिदींवरील लाऊड स्पीकर हे उतरले गेलेच पाहिजे. मग 3 तारखेनंतर आमच्याकडून कोणताही त्रास होणार नाही. असा एकप्रकारे अल्टीमेटमच राज ठाकरे यांनी दिला. यावरच प्रतक्रिया देताना शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी थेट राज ठाकरेंना भाजपचा भोंगा म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
INS Vikrant घोटाळा : किरीट सोमय्यांना हायकोर्टाचा मोठा दिलासा!
विश्वास नांगरे पाटलांना निलंबित करावे; प्रकाश आंबेडकरांची मागणी
“मी शिवरायांचं नाव घेत नाही हा आरोप खोटा” – शरद पवार
राज ठाकरेंवर गुन्हा दाखल, सभेत उंचावली होती तलवार
“तुम्ही फार धुरफुटे झालात, तुमचं तोंड बघा कसं सुजलंय”; आव्हाडांचा राज ठाकरेंना टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

