Share

INS Vikrant घोटाळा : किरीट सोमय्यांना हायकोर्टाचा मोठा दिलासा! 

Published On: 

मुंबई : आयएनएस विक्रांत निधी अपहार प्रकरणात भाजपा नेते किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा निल सोमय्या चांगलेच अडचणीत सापडले आहेत. सत्र न्यायालयाने सोमय्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर आदेश चुकीचा असल्याचा दावा करत सोमय्या यांनी या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली होती. दरम्यान किरीट सोमय्या यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

किरीट सोमय्या यांना हायकोर्टाने अटकेपासून दिलासा दिला आहे. हायकोर्टाने अटकेपासून दिलासा देताना तक्रार अस्पष्ट आणि प्रसारमाध्यमांच्या वृत्तांवर आधारलेली असल्याचं निरीक्षण नोंदवलं. यावेळी कोर्टाने किरीट सोमय्यांना चौकशीसाठी पोलिसांसमोर हजर राहावं लागणार असल्याचंही स्पष्ट केलं आहे. तसेच अटक झाल्यास ५० हजारांच्या जामीनावर सुटका करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. सोमय्यांना सोमवार १८ एप्रिलपासून सलग चार दिवस चौकशीला हजेरी लावण्याचे निर्देश देखील देण्यात आले आहेत. 

किरीट सोमय्या आणि INS विक्रांत संबंध काय?

२०१३ मध्ये भाजप नेते किरीट सोमय्या यांनी तत्कालीन काँग्रेस -राष्ट्रवादी सरकार विरोधात आंदोलन केले होते. ही युद्धनौका खाजगी भागीदाराला देत याचा व्यावसायिक वापर करण्याचा राज्य सरकारचा डाव असल्याचा आरोप त्यांनी केला होता. लोकशाही आघाडी सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर तेव्हा याचा व्यावसायिक वापर करण्याचे प्रयत्न राज्य सरकारने केले. हा एक प्रकारे २०० कोटींचा कमिशन घोटाळा असल्याचे त्यावेळी म्हटले जात होते. आयएनएस विक्रांतचे युद्ध संग्रहालय केलं जावं ती भंगारात काढू देणार नाही याबाबत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना किरीट सोमय्या यांनी पत्र लिहिले होते. यासाठी किरीट सोमय्या यांनी विक्रांत स्मारकासाठी मदत निधी गोळा मोहिम राबवली होती.

संजय राऊत यांचा INS विक्रांत संबंधी खुलासा-

आयएनएस विक्रांत या युद्धनौकेचे म्युझियममध्ये रूपांतर केले पाहीजे अशी भूमिका भाजपच्या काही नेत्यांनी घेतली होती. यातही विशेषकरून भाजप नेते किरीट सौमय्या यांनी एक मोहीम सुरु केली. या मोहमेंतर्गत लोकवर्गणीतून २०० कोटी रुपये जमा करून राज्यपाल महोदयांकडे सुपूर्द करू,असे सांगितले गेले. मात्र किरीट सोमय्यांनी ही वर्गणी राज्यपालांकडे दिली नसल्याचा खुलासा आरटीआयच्या माध्यमातून झाला आहे.आयएनएस विक्रांतसाठी किरीट सोमय्यांनी कोट्यवधी रुपये जमा केले. त्यासाठी लाखो लोकांनी पैसे दिले. स्वतः किरीट सोमय्यांनी 57 कोटी रुपये जमा केले. पण हे पैसे राजभवनात जमा झालेच नाहीत. असे राऊत यांनी म्हटले आहे. विक्रांतशी देशातील नागरिकांच्या भावना जोडल्या गेल्या आहेत. ते देशाच्या संरक्षण शक्तीचे एक प्रतिक आहे. त्याच्यामध्ये जर घोटाळा होत असेल तर हा देशद्रोह ठरतो. असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

माजी सैनिकाची सोमय्यांविरोधात तक्रार दाखल-

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी INS विक्रांत प्रकरणी खुलासा केल्यानंतर माजी सैनिक बबन भोसले यांनी ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात किरीट सोमय्या यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. सोबतच त्यांचे पुत्र नील सोमय्या यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला.किरीट सोमय्यांनी केले आरोपांचे खंडन-किरीट सोमय्या यांनी आज (१२ एप्रिल) ट्वीटरवर एक व्हिडिओ पोस्ट करत संजय राऊत यांच्या आरोपांचे खंडन केले आहे. “सेव्ह आयएनएस विक्रांत मोहिमे अंतर्गत फक्त ११ कोटी जमा करण्यात आले होते. १० डिसेंबर २०१३ साली आम्ही सेव्ह आयएनएस विक्रांत मोहिम राबवली. मात्र आज १० वर्षांनंतर संजय राऊत म्हणत आहेत की, ५८ कोटी जमा झाले. यापूर्वीही संजय राऊत यांनी ७ आरोप केले आहेत. मात्र एकाचाही पुरावा मुंबई पोलिसांकडे नाही. १७ डिसेंबर २०१३ साली जेव्हा आपण राष्ट्रपती यांना भेटलो तेव्हा शिवसेना नेते गोपीनाथ मुंडेही सोबत होते. त्यामुळे ठाकरे सरकारचे घोटाळे बाहेर काढणे बंद होणार नाही. आम्ही या विरोधात हायकोर्टात जाणार.”, असा इशारा किरीट सोमय्या यांनी ट्वीट करत दिला आहे.

महत्वाच्या बातम्या :

राज ठाकरेंवर गुन्हा दाखल, सभेत उंचावली होती तलवार
“तुम्ही फार धुरफुटे झालात, तुमचं तोंड बघा कसं सुजलंय”; आव्हाडांचा राज ठाकरेंना टोला
“सभेला गर्दी होते, पण मते मिळत नाही” आठवलेंनी राज ठाकरेंना डिवचलं
“…मविआ सरकारचाच किंवा कोणत्या नेत्याचा डाव होता का?”, सिल्व्हर ओक प्रकरणी प्रवीण दरेकरांचा सवाल
राज ठाकरे आज भाजपच्या द्वेषमूलक विचारांची तळी उचलत आहेत- रोहित पवार

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!