🕒 1 min read
Prakash Ambedkar | मुंबई : सत्तेतून पायऊतार झाल्यानंतर उद्धव ठाकरे गट राजकीय समीकरण बळकट करण्यात व्यस्त आहेत. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या वंचित बहुजन आघाडीशी उद्धव ठाकरे युती करणार असल्याची चर्चा आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्यात युती होणार असल्याचं चित्र असतानाच आता प्रकाश आंबेडकर यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने अनेक चर्चा रंगू लागल्या आहेत.
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यापूर्वी इंदू मिलबाबत चर्चा करण्यासाठी माझी भेट घेतली होती. या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावे इन्स्टिट्यूशन सुरू करण्याची मागणी केली”, अशी प्रतिक्रिया प्रकाश (Prakash Ambedkar) आंबेडकर यांनी दिली.
ते म्हणाले, “कोण-कोणाला भेटलं की त्याला राजकारणाचा वास येतो असं नाही. आपापल्या वैयक्तिक भूमिका सर्वांच्या आहेत. मी 40 वर्षांपासून राजकारणात आहे. काँग्रेसने आम्हाला कायम चेपलं, शिवसेना आता आमच्यासोबत येत आहे. काँग्रेसच्या सोबत कायम भांड्याला भांड लागलं.
“त्यामुळे शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी कोणासोबत जायचं ते त्यांनी ठरवावं, बॉल आता त्यांच्या कोर्टात आहे”, असंही प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यावेळी बोलताना म्हणालेत. “आता मुख्यमंत्र्यांसोबत इन्स्टिट्यूशन उभं करण्यासंदर्भात चर्चा झाली. पुतळ्याबाबत काही आक्षेप होते. त्याची कल्पना दिली. त्यासाठी समिती नेमून त्या पुतळ्याची पाहणी ते करतील”, असं आंबेडकरांनी सांगितलं
महत्वाच्या बातम्या :
- Breaking News | मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री उद्या अचानक दिल्ली दौऱ्यावर, राजकीय घडामोडींना वेग
- Devendra Fadanvis | चंद्रकांत पाटील यांच्यावरील शाईफेक प्रकरणी देवेंद्र फडणवीसांनी पोलिसांना दिले ‘हे’ महत्त्वाचे आदेश
- Rajesh Tope | पवार साहेबांच्या केसालाही धक्का नाही लागला पाहिजे, राजेश टोपेंचा राज्य सरकारला इशारा
- Ajit Pawar | शरद पवारांना धमकी देणारी व्यक्ती सापडली, अजित पवारांनी दिली माहिती
- Pravin Darekar | आरोप करण्याशिवाय विरोधी पक्षाला काही काम उरलेलं नाही – प्रविण दरेकर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
