Share

“मी शिवरायांचं नाव घेत नाही हा आरोप खोटा” – शरद पवार

Published On: 

मुंबई : राज ठाकरे यांची काल मंगळवारी ठाण्यात ‘उत्तर सभा’ झाली. यावेळी शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर जोरदार टीका करताना राज ठाकरे म्हणाले, शरद पवार जेव्हा भाषण करतात तेव्हा ते फुले, शाहू, आंबेडकरांचा महाराष्ट्र असे म्हणतात. पण ते कधीही शिवरायांचा महाराष्ट्र असे म्हणत नाहीत. याचे कारण काय? याचे कारण मुस्लिम मते जातील, ही भीती त्यांना वाटते. हा महाराष्ट्र फुले, शाहू, आंबेडकरांचा आहेच. हे मान्यच आहे. मात्र, मला त्यांना हे सांगायचे आहे की, फुले, शाहू, आंबेडकरांच्याआधी हा महाराष्ट्र शिवरायांचा आहे. असा आरोप यावेळी शरद पवारांवर केला होता.

राज ठाकरेंच्या या आरोपाला शरद पवार यांनी प्रत्युतर दिले आहे. म्हणाले, मी शिवरायांचं नाव घेत नाही हा आरोप खोटा आहे. माझं अमरावतीचं भाषण बघा, मी अमरावतीत २५ मिनिटे शिवरायांवर बोललो. या तिघांचे नाव घेणं म्हणजे शिवरायांच्या विचारांचं नाव घेणं असे जोरदार प्रत्युत्तर शरद पवारांनी दिले.

राज ठाकरेंनी शरद पवारांनी केलेल्याया या आरोपाला जितेंद्र आव्हाड यांनी देखील प्रत्युत्तर दिले आहे. म्हणाले, शिवाजी महाराजांची समाधी कोणी शोधून काढली? महात्मा फुलेंनी काढली. कुठलही हत्यार नव्हत पण केवळ ज्ञानावरती आधारित इतिहासाचं संशोधन करणे हे आश्चर्याच आहे. महात्मा फुलेंनी ही समाधी शोधली पाहिल्यांदा शिवजयंती साजरी केली शाहू महाराज तर त्यांचे वारसदार आहेत आणि हे दोघेही माझे आदर्श आहेत म्हणत बाबासाहेबांनी संविधान लिहिलं त्यामुळे तिघांच्याही रक्तात, ओठात, क्रियेत शिवाजी महाराज आहेत. या तिघांचीही लेखन वाचून बघा. त्यामुळे या तिघांचे नाव घेण म्हणजे शिवरायांच्या विचारांचं नाव घेण. हे तुम्हाला नाही समजणार कारण तुम्हाला फुट पाडण्याची सवय आहे.

महत्वाच्या बातम्या –

“तुम्ही फार धुरफुटे झालात, तुमचं तोंड बघा कसं सुजलंय”; आव्हाडांचा राज ठाकरेंना टोला
“सभेला गर्दी होते, पण मते मिळत नाही” आठवलेंनी राज ठाकरेंना डिवचलं
“…मविआ सरकारचाच किंवा कोणत्या नेत्याचा डाव होता का?”, सिल्व्हर ओक प्रकरणी प्रवीण दरेकरांचा सवाल
राज ठाकरे आज भाजपच्या द्वेषमूलक विचारांची तळी उचलत आहेत- रोहित पवार
व्यासपीठावरील ‘त्या’ कृतीमुळे राज ठाकरे अडचणीत ; गुन्हा दाखल होण्याची शक्यता

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!