Share

Vasant More | “स्मशानभूमीत येईन, पण मनसेच्या शहर कार्यालयात जाणार नाही”; वसंत मोरे असं का म्हणाले?

Published On: 

🕒 1 min read

Vasant More | पुणे : मनेसे नेते वसंत मोरे (Vasant More) यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी एका लग्नसोहळ्यादरम्यान खूली ऑफर दिली. तात्या राष्ट्रवादीत कधी येताय, वाट पाहतोय, असे अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले.  अजित पवारांच्या ऑफरनंतर आता वसंत मोरे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. याविषयी वसंत मोरे यांना विचारले असता, मी अजूनही मनसेतच असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, मनसे नेते वसंत मोरे पुन्हा एकदा आपल्या पक्षावर नाराज असून नुकतीच पुण्यात अमित ठाकरे यांनी त्यांची भेट घेतली. अमित ठाकरे यांनी आपली बाजू ऐकून घेण्यासाठी बोलावलं होतं असं वसंत मोरे यांनी सांगितलं आहे. यावेळी त्यांनी आपल्या नाराजीसाठी शहर कार्यालय जबाबदार असल्याचं सांगितलं आहे.

कोअर कमिटीच्या बैठकीला वसंत मोरे गैरहजर होते. यासंदर्भात त्यांना विचारले असता ते म्हणाले “हा स्वाभिमानाचा विषय नाही. माझा स्वाभिमान दुखावला जात नाही. कोअर कमिटीने एखाद्या स्मशानभूमीत बैठक घेतली तर तिथेही जाईन, पण शहर कार्यालयात जाणार नाही.”

याचं कारणंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. ते म्हणाले, “मी तिथे अनेक स्वप्नं पाहिली होती. महानगरपालिका जिंकल्यानंतर गुलाल उधळण्याचं, नगरसेवक निवडून आल्यानंतर पेढे वाटण्याचं स्वप्न पाहिलं होतं. पण माझं पद गेल्यावर गुलाल उधळण्यात आला, पेढे वाटण्यात आले. त्यामुळे मी त्या पक्ष कार्यलयात जाणार नाही.”

“मनसेमध्ये एकत्रित बसवून मिटवायची इच्छा दिसत नाही. माझं एकत्रित कुटुंब आहे. आम्हा भावांमध्ये आजही वाद होतात, पण आम्ही सगळे एकत्र बसून मिटवतो. इथे तसं होताना दिसत नाही,” असंही वसंत मोरे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!