Share

“माझ्या शिवराळ भाषेचं काल कौतुक व्हायला हवं होतं कारण…”, राज ठाकरेंच्या टीकेला संजय राऊतांचे प्रत्युत्तर

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी काल (१२ एप्रिल) उत्तर सभा घेतली यावेळी त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) यांच्यावर निशाणा साधत जोरदार टीका केली. संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांच्याबद्दल शिवराळ भाषा वापरल्याचा त्यांना आणि शिवसेनेला गर्व असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला. यावरच संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“माझ्या शिवराळ भाषेचे काल कौतुक व्हायला हवे होते. कारण ते मराठी अभिमानी म्हणून कालपर्यंत मिरवत होते. महाराष्ट्राच्या अस्मितेचे, मराठी माणसाच्या स्वाभिमानाचे आम्हीच एकमेव तारणहार आहोत, शिवसेना नाही. अशा लोकांची भूमिका घेऊन ते राजकारणात आले आहेत. त्यामुळे माझ्या शिवराळ भाषेचे त्यांनी कौतुक केले असते, शिवसेनेला पाठींबा दिला असता तर त्यांचे मराठी भाषिक प्रेम दिसून आले असते.”, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

तसेच पुढे ते म्हणाले की, “मी आजच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याबद्दल बोललो. ते मला हेच म्हणाले किरीट सोमय्या यांना मी शिवराळ भाषा का वापरली याचा अभ्यास जर त्यांनी केला असता तर एक मराठी माणूस म्हणून त्यांना माझ्या वेदना कळल्या असत्या. याच किरीट सोमय्या यांनी महाराष्ट्रात मराठी भाषा सक्तीची नसावी यासाठी कोर्ट गाठले होते. अशा मराठी भाषिकाविरोधात मी शिवराळ भाषा वापरली. किरीट सोमय्यांनी मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्यासाठी प्रेजेंटेशन केले आहे. याला संतापून जर माझ्या तोंडून शिवी बाहेर पडत असेल तर मी त्याला शिवी म्हणतच नाही. ती त्यांची लायकीच आहे.तो एक मराठी माणसाच्या शिवसेनेच्या तोंडून निघालेला अंगार आहे.”

महत्वाच्या बातम्या:

“राज ठाकरे भाजपचाच भोंगा”, संजय राऊत यांचे मोठे विधान

“…तर किरीट सोमय्यांना ‘शिवतीर्थ’वर बोलवून सत्कार करा”, संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान

“त्यांना फार महत्व देऊ नका, योग्य वेळी मी…”, राज ठाकरेंच्या टीकेवर अजित पवारांची प्रतिक्रिया

“संपादक जेलमध्ये जाणार म्हणून…”, संजय राऊतांच्या ‘त्या’ ट्वीटला ‘मनसे’चे प्रत्युत्तर

“जितनी चाबी भरी ‘भाजपा’ ने उतना…”, राष्ट्र्वादीचा राज ठाकरेंना टोला

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!