Share

“राज ठाकरे भाजपचाच भोंगा”, संजय राऊत यांचा पलटवार

Published On: 

मुंबई: पाडवा भाषणात राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदीवरील भोंग्याबाबत मोठे वक्तव्य केले होते. कालच्या (१२ एप्रिल) उत्तर सभेतही त्यांनी यावर पुन्हा एकदा भाष्य केले आहे. 3 तारखेला ईद आहे. माझी राज्य सरकारला, गृह खात्याला विनंती आहे की, कुठेही तेढ, दंगल आम्हाला निर्माण करायच्या नाहीत. मला तशी इच्छा देखील नाही. महाराष्ट्राचं स्वास्थ आम्हाला बिघडवायचं नाही. पण आज 12 तारीख आहे. 12 ते 3 मे महाराष्ट्रातील सर्व मशिदींमधील मौलवींना तुम्ही बोलवून घ्या त्यांना सांगा सर्व मशिदींवरील लाऊड स्पीकर हे उतरले गेलेच पाहिजे. मग 3 तारखेनंतर आमच्याकडून कोणताही त्रास होणार नाही. असा एकप्रकारे अल्टीमेटमच राज ठाकरे यांनी दिला. यावरच प्रतक्रिया देताना शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी थेट राज ठाकरेंना भाजपचा भोंगा म्हटले आहे.

“अल्टीमेटम देण्याची ताकद या देशात आणि राज्यात फक्त बाळासाहेब ठाकरे यांच्या मध्येच होती. हा जो भोंगा वाजत आहे. ते भाजपचाच भोंगा आहेत. जे आमच्याशी लढू शकत नाहीत, ते असे भोंगे लावून एक वातावरण निर्माण करतात. बाळासाहेब ठाकरे यांच्यातच फक्त अल्टीमेटम देण्याची कुवत होती. ईडीच्या कारवाईबाबत केंद्राकडून अभय मिळाल्यामुळे हा भोंगा वाजू लागला आहे. आम्ही या खोट्या कारवायाला सामोरे जात आहे. एका वैफल्य्यातून हे भोंगे वाजत आहे.”, असा टोला अंजय राऊत यांनी लगावला आहे.

दरम्यान राज ठाकरे यांनी शिवराळ भाषेवरून केलेल्या टीकेलाही संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “माझ्या शिवराळ भाषेचे काल कौतुक व्हायला हवे होते. कारण ते मराठी अभिमानी म्हणून कालपर्यंत मिरवत होते. महाराष्ट्राच्या अस्मितेचे, मराठी माणसाच्या स्वाभिमानाचे आम्हीच एकमेव तारणहार आहोत, शिवसेना नाही. अशा लोकांची भूमिका घेऊन ते राजकारणात आले आहेत. त्यामुळे माझ्या शिवराळ भाषेचे त्यांनी कौतुक केले असते, शिवसेनेला पाठींबा दिला असता तर त्यांचे मराठी भाषिक प्रेम दिसून आले असते.”, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या:

“…तर किरीट सोमय्यांना ‘शिवतीर्थ’वर बोलवून सत्कार करा”, संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान

“त्यांना फार महत्व देऊ नका, योग्य वेळी मी…”, राज ठाकरेंच्या टीकेवर अजित पवारांची प्रतिक्रिया

“संपादक जेलमध्ये जाणार म्हणून…”, संजय राऊतांच्या ‘त्या’ ट्वीटला ‘मनसे’चे प्रत्युत्तर

“जितनी चाबी भरी ‘भाजपा’ ने उतना…”, राष्ट्र्वादीचा राज ठाकरेंना टोला

मोठी बातमी! धनंजय मुंडेंना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रूग्णालयात दाखल

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!