Share

“…तर किरीट सोमय्यांना ‘शिवतीर्थ’वर बोलवून सत्कार करा”, संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान

Published On: 

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी काल (१२ एप्रिल) उत्तर सभा घेतली यावेळी त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) यांच्यावर निशाणा साधत जोरदार टीका केली. संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांच्याबद्दल शिवराळ भाषा वापरल्याचा त्यांना आणि शिवसेनेला गर्व असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला. यावरच संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत थेट राज ठाकरेंना आव्हान दिले आहे.

“मी आजच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याबद्दल बोललो. ते मला हेच म्हणाले किरीट सोमय्या यांना मी शिवराळ भाषा का वापरली याचा अभ्यास जर त्यांनी केला असता तर एक मराठी माणूस म्हणून त्यांना माझ्या वेदना कळल्या असत्या. याच किरीट सोमय्या यांनी महाराष्ट्रात मराठी भाषा सक्तीची नसावी यासाठी कोर्ट गाठले होते. अशा मराठी भाषिकाविरोधात मी शिवराळ भाषा वापरली. किरीट सोमय्यांनी मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्यासाठी प्रेजेंटेशन केले आहे. याला संतापून जर माझ्या तोंडून शिवी बाहेर पडत असेल तर मी त्याला शिवी म्हणतच नाही. ती त्यांची लायकीच आहे.तो एक मराठी माणसाच्या शिवसेनेच्या तोंडून निघालेला अंगार आहे.”, असे अंजय राऊत यांनी म्हटले आहे.

“तुम्हाला जर किरीट सोमय्यांचे समर्थन करायचे असेल, तर नक्कीच तुम्ही माझ्या शिवराळ भाषेवर टीका करा. तुमची भूमिका बदलली असेल तर, किरीट सोमय्या यांना तुमच्या शिवतीर्थ बंगल्यावर बोलवा आणि त्यांचे शाल-श्रीफळ देऊन सत्कार करा. आणि त्यांच्या पुढे झुका. आम्ही काही म्हणणार नाही.”, असे आव्हान संजय राऊत यांनी राज ठाकरेंना दिले आहे.

काय म्हणाले होते राज ठाकरे?

 नुसत्या मालमत्ता जप्त केल्या तर पत्रकार परिषदेत शिव्या द्यायला लागले. काय तरी पत्रकार परिषदेतली भाषा. वर्तमानपत्राचा संपादक पत्रकार परिषदेत येऊन भ**, चु** शब्द वापरतो. अंगाशी आलं म्हणून हे होतंय. यांच्यासाठी आमच्या आजोबांनी शब्द काढला होता. हे सगळे ‘लवंडे’ म्हणजे काय? पूर्वी जेवायला पत्रावळ्या असायच्या. त्यातला द्रोण वरण-आमटी पडली की लवंडायचं. तसे हे लवंडे, शिवसेनेकडून पडलं की तिकडे लवंडायचं, राष्ट्रवादीकडून पडलं की तिकडे लवंडायचं. त्यामुळे संजय राऊत हे नेमके कुठले हेच कळत नाही. शिवसेना की राष्ट्रवादी? असा खोचक सवाल करत राज ठाकरे यांनी संजय राऊतांवर टीका केली.

महत्वाच्या बातम्या:

“त्यांना फार महत्व देऊ नका, योग्य वेळी मी…”, राज ठाकरेंच्या टीकेवर अजित पवारांची प्रतिक्रिया

“संपादक जेलमध्ये जाणार म्हणून…”, संजय राऊतांच्या ‘त्या’ ट्वीटला ‘मनसे’चे प्रत्युत्तर

“जितनी चाबी भरी ‘भाजपा’ ने उतना…”, राष्ट्र्वादीचा राज ठाकरेंना टोला

मोठी बातमी! धनंजय मुंडेंना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रूग्णालयात दाखल

“अशा लोकांना आमचे आजोबा लवंडे म्हणायचे”; राज ठाकरेंचा संजय राऊतांवर घणाघात

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!