Share

मोबाईल रिपेअर करणाऱ्याने चरणजीतसिंह चन्नीला हरवले!

Published On: 

पंजाब : पंजाबमध्ये आप जोरदार फार्मात आहे. एका सर्वसामान्य माणसानं चरणजीत सिंह यांचा पराभव केला आहे. चरणजीत सिंह यांचा पराभव करणाऱ्या आपच्या उमेदवाराचं नाव लाभ सिंह उगोके असं आहे. आपचा हा विजयी उमेदवार एका मोबाईल रिपेरींग करणाऱ्या कंपनीत नोकरीला आहे असे केजरीवाल म्हणाले.

तसेच केजरीवाल म्हणाले, पंजाबच्या लोकांनी कमाल करुन दाखवली आहे . पंजाबच्या निकालाने मोठमोठ्या खुर्च्या हादरल्या आहेत. सुखबिंदसिंह बादल, प्रकाशसिंह बादल, नवज्योत सिंह सिद्धू, विक्रम सिंह मजिठिया पराभूत झाले केजरीवाल यांनी सांगितलं आहे. पंजाबमध्ये बदल घडवून आणला असल्याचे देखील सांगितले.

केजरीवाल म्हणाले, “आपण असा भारत बनवुया, की कुठल्याही मुलाला वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी युक्रेनमध्ये जाण्याची गरज पडू नये, इतके मेडीकल कॉलेज आपण आपल्याच देशात बनवुया. तसेच म्हणाले, तुम्हाला माहितीय? पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीतसिंह चन्नी यांना हरवणारा कोण आहे? त्याचं नाव आहे लाभ सिंग उगोके. हा काय करतो ? तो एका मोबाईल रिपेअर करणाऱ्या कंपनीत नोकरी करतो, त्याची आई सरकारी शाळेत सफाई कामगार आहे, वडील शेतात रोजंदारीवर काम करतात, अशा व्यक्तीने चन्नीला हरवलं आहे” असे केजरीवाल यांनी कौतुक करीत सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!