Share

शिवसेना, राष्ट्रवादीच्या पराभवावर फडणवीसांनी डागले टीकास्त्र

Published On: 

🕒 1 min read

पणजी : पाचही राज्यांचे निकाल जवळपास स्पष्ट होताना दिसत आहे. गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपाला आघाडी मिळाली आहे. आतापर्यंतच्या निकालानुसार भाजप गोव्यात 20 जागांवर आघाडीवर आहे. तर तीन अपक्ष आणि अन्य स्थानिक पक्षांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे गोव्यात भाजपची सत्ता येण्याची दाट शक्यता आहे. भाजपला आव्हान देण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसही रिंगणात उतरले होते परंतु त्यांना तर भोपळाही फोडता आलेला नाही. इतकंच नाही या दोन्ही पक्षाच्या उमेदवारांचे डिपॉझिट ही जप्त होणार आहे. याच संदर्भात विरोधी पक्षनेते आणि गोव्याचे भाजप प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी गोव्यातील शिवसेनेच्या पराभवावर खोचक टीका केली.

राष्ट्रवादी आणि शिवसेनेला नोटापेक्षाही कमी मतं

शिवसेना-राष्ट्रवादीच्या पराभवाबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस म्हणाले, ‘मी पहिल्या दिवशीच सांगितलं होतं की शिवसेनेची लढाई आमच्याशी नाही तर नोटाशी आहे. तुम्ही पाहिलं तर राष्ट्रवादी आणि शिवसेना यांची एकत्रित मतं पाहिली तरी ती नोटापेक्षा कमी आहेत. आमच्या मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात जाऊन त्यांनी मोठी सभा घेतली होती. तिथे त्यांच्या उमेदवाराला 97 मतं मिळाली आहेत’. त्याचबरोबर काँग्रेसला आत्मचिंतन करण्याची गरज आहे. असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

‘उत्पल पर्रिकर आमच्याच परिवारातील’

मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रिकर यांच्या पराभवावर प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले की, बाबूश विजय होणार हे पहिल्या दिवशीच स्पष्ट झाले होते. त्याचा मला आनंद आहे. पण उत्पल पर्रिकर पराभूत झाल्याचा आनंद मी व्यक्त करत नाही. कारण ते आमच्याच परिवारातील आहेत. त्यांनी योग्य निर्णय घेतला असता तर आज ते आमदार असते.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!