🕒 1 min read
Health Care | टीम महाराष्ट्र देशा: हिवाळा सुरू होतात मोसमी आजारांचा (Viral Infaction) धोका वाढायला लागतो. त्यामुळे हिवाळ्यामध्ये आरोग्याची (Health) अधिक काळजी (Care) घ्यावी लागते. हिवाळ्यात बदलत्या वातावरणामुळे सर्दी, ताप खोकल्याचा त्रास खूप वाढतो. अनेकदा या समस्या औषधे घेऊ सुद्धा दूर होत नाही. अशा परिस्थितीत हे आजार दूर करण्यासाठी तुम्ही काही नैसर्गिक पद्धतींचा वापर करू शकतात. तुम्ही घरामध्ये उपलब्ध असलेल्या काही गोष्टींच्या मदतीने या समस्या टाळू शकतात. या पदार्थांमुळे ताप आणि सर्दी त्वरित बरी होईल. त्याचबरोबर या पदार्थांचे सेवनाने रोगप्रतिकारशक्ती देखील मजबूत होण्यास मदत होते. सर्दी आणि तापापासून संरक्षण करण्यासाठी पुढील पदार्थांचे सेवन करावे.
लसूण
लसूण हा औषधी गुणधर्मांचा खजिना आहे. लसणाच्या नियमित सेवनाने शरीर निरोगी राहून, रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. त्याचबरोबर लसणाच्या नियमित सेवनाने शरीर उबदार राहते. लसणामध्ये माफक प्रमाणात अँटीव्हायरस आणि अँटी फंगल गुणधर्म आढळतात. हे गुणधर्म सर्दी आणि ताप दूर करण्यासाठी मदत करतात.
आले
आल्यामध्ये मुबलक प्रमाणात अँटीऑक्सीडेंट गुणधर्म आढळतात. हे गुणधर्म शरीराला सर्दी आणि तापापासून दूर ठेवतात. त्याचबरोबर आल्याच्या नियमित सेवनाने शरीर सुदृढ राहते. तुम्ही भाज्यांमध्ये किंवा चहामध्ये आल्याचा उपयोग करू शकतात.
मध
संसर्गजन्य रोग कमी करण्यासाठी मधाचे नियमित सेवन केले पाहिजे. त्याचबरोबर मधाच्या नियमित सेवनाने शरीर उबदार राहून रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. मधाच्या नियमित सेवनाने घसा खवखवणे आणि खोकल्याच्या समस्या ही दूर होऊ शकतात.
सर्दी ताप असल्यास तुम्ही हे खाद्यपदार्थ खाऊन ते दूर करू शकतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की, जर तुमची सर्दी आणि ताप 1-2 दिवसात बरा होत नसेल, तर डॉक्टरांचा सल्ला घेऊन औषध घ्यायला विसरू नका.
टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.
महत्वाच्या बातम्या
- Samsung Mobile | सॅमसंगच्या ‘या’ मोबाईलवर बंपर डिस्काउंट, करा आजच खरेदी
- IND vs BAN | शेवटच्या सामन्यात 9 धावा करत बाद झाला ऋषभ पंत, चाहत्यांनी व्यक्त केली नाराजी
- Corona Virus | इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठी आहारात करा ‘या’ गोष्टींचा समावेश
- SBI Recruitment | SBI मध्ये ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू
- Maharashtra Weather Update | महाराष्ट्र गारठला, तर उत्तर भारतातही थंडीचा कहर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now