मुंबई: काही दिवसांपूर्वी ‘काँग्रेस मुक्त भारत’ असा नारा मोदींनी दिला होता. हा नारा कदाचित सत्यात उतरणार असल्याचे दिसून येत आहे. आजच्या निकालावरून काँग्रेस किती पिछाडीवर गेली आहे हे समजत आहे. पंजाबमध्ये सत्ताधारी काँग्रेस अवघ्या १७ जागांवर घसरले आहे. पंजाबमध्ये जनतेने काँग्रेसला साफ नाकारले आहे. पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी दोन जागांवर लढत होते आणि दोन्ही जागांवरून त्यांचा पराभव झाला. माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनाही आपली जागा वाचवता आली नाही आणि निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांचाही अमृतसर पूर्व मतदारसंघातून पराभव झाला.
उत्तर प्रदेशात केवळ 1 जागा
दुपारी ३ वाजेपर्यंतच्या ट्रेंडनुसार यूपीमध्ये काँग्रेसला फक्त १ जागा मिळत आहे. आराधना मिश्रा मोना रामपूर खासमधून सतत आघाडीवर आहेत, तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अजय कुमार लल्लू तमकुमी राज विधानसभा मतदारसंघातून तिसऱ्या क्रमांकावर आहेत. यूपीमध्येही काँग्रेसची मतांची टक्केवारी ३ टक्क्यांच्या जवळ पोहोचली आहे. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला 7 जागा मिळाल्या होत्या.
उत्तराखंडमध्येही बहुमतापासून दूर
उत्तराखंडमध्ये काँग्रेसला मोठ्या आशा होत्या, मात्र उत्तराखंडमध्येही काँग्रेस बहुमतापासून दूर असल्याचे दिसत आहे. उत्तराखंडमध्ये काँग्रेस 19 जागांवर आघाडीवर असून बहुमतासाठी 36 जागांची गरज आहे. उत्तराखंडमधील काँग्रेसचे संभाव्य मुख्यमंत्री उमेदवार हरीश रावत स्वतः आपली जागा वाचवू शकले नाहीत आणि मोठ्या फरकाने निवडणूक हरले.
मणिपूरमध्येही निराशाच
मणिपूरमध्ये काँग्रेस विजयाचा दावा करत होती पण मणिपूरमध्येही काँग्रेसचा पराभव होत आहे. मणिपूरमध्ये काँग्रेसने डाव्या पक्षांसोबत युती केली होती, पण ही आघाडीही काही कमाल दाखवू शकली नाही. मणिपूरमध्ये काँग्रेसला दुहेरी आकडाही गाठता आला नाही. दुपारी ३ वाजेपर्यंतच्या ट्रेंडनुसार मणिपूरमध्ये काँग्रेस ६ जागांवर आघाडीवर आहे.
गोव्यातील युतीही फेल
गोव्यातही काँग्रेसने विजयाचा दावा केला होता आणि गोवा फॉरवर्ड पक्षासोबत युतीही केली होती, मात्र या आघाडीला फारशी कमाल दाखवता अली नाही. दुपारी 3 वाजेपर्यंत काँग्रेस केवळ 12 जागांवर आघाडीवर आहे. गोव्यात सरकार स्थापनेसाठी काँग्रेसनेही जोरदार तयारी केली होती. पण आता खर्च सरकार स्थापन होणार का हे लवकरच कळेल.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

