Share

‘सर्व विरोधी पक्ष एकत्र बसून चर्चा करु’ – संजय राऊत

Published On: 

मुंबई : शिवसेना उत्तर प्रदेश आणि गोव्यात शिवसेना सपाटून पडली आहे. पाच राज्यांच्या निवडणूक निकालात पंजाब वगळता चार राज्यात भाजपला दणदणीत विजय प्राप्त झाला आहे. संजय राऊत म्हणाले, “उत्तर प्रदेशात विरोधी पक्षांचं चांगलं मॅनेजमेंट झाले असते. काँग्रेसला सोबत घेतलं असतं तर चित्र वेगळं दिसलं असतं”.

तसेच ‘काँग्रेसला यापुढे त्यांच्या धोरणात बदल करावा लागेल, आम्ही गोव्यात एकत्र लढण्याचा प्रयत्न केला. उत्तर प्रदेशातही काँग्रेस आणि शिवसेनेनं एकत्र निवडणूक लढवावी अशी आमची अपेक्षा होती. भविष्यात आम्ही एकत्र विरोधी पक्ष देशभरात कशा प्रकारे काम करता येईल यासाठी एकत्र बसून चर्चा करु’, असे संजय राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले.

गोव्यात आणि उत्तर प्रदेशातही शिवसेनेचा एकही उमेदवार विजयाच्या जवळ पोहोचला नाही. उत्तर प्रदेश आणि गोव्यात शिवसेना सपाटून पडली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले अजून लढाई संपली नाही असे वक्तव्य देखील केले. तसेच राजकारणात, लोकशाहीत जो जिंकतो त्याचं अभिनंदन करण्याची परंपरा आपल्या देशात आहे. त्यामुळे ज्या ज्या पक्षाचा विजय झाला त्यांचं मी शिवसेनेकडून अभिनंदन करतो.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!