मुंबई : टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड याने महान भारतीय फलंदाज विराट कोहलीवर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. कोहली लवकरच संघासाठी धावा करेल, असे त्याने म्हटले आहे. द्रविडच्या मते, विराटने त्याचा दर्जा इतका उंचावला आहे की, जेव्हा तो शतक करतो तेव्हाच लोक त्याला यशस्वी मानतात.
विराट कोहली गेल्या अनेक दिवसांपासून खराब फॉर्ममध्ये आहे. नोव्हेंबर २०१९ पासून त्याला कोणत्याही फॉरमॅटमध्ये शतक झळकावता आलेले नाही. त्याच वेळी, त्याचे यंदाचे आकडे अगदी साधे आहेत. आयपीएल २०२२ स्पर्धा विराट कोहलीसाठी काही खास नव्हती. तीन सामन्यांत तो शून्यावरही बाद झाला.
इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यापूर्वी लीसेस्टरशायरविरुद्धच्या चार दिवसीय सराव सामन्यात विराट चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होता. त्याने पहिल्या डावात ३३ तर दुसऱ्या डावात ६७ धावा केल्या. त्यामुळे विराट आपली हरवलेली लय परत मिळवेल अशी आशा चाहत्यांना आहे. द्रविडने विराट कोहलीच्या फॉर्मबाबत मोठे वक्तव्य केले आहे. पत्रकार परिषदेदरम्यान तो म्हणाला, ”एक खेळाडू म्हणून तुम्हाला अशा परिस्थितीतून जावे लागते. विराटमध्ये प्रेरणेची कमतरता आहे असे मला वाटत नाही. शतक ठोकणे हे केवळ लक्ष्य नसावे, तर कठीण खेळपट्टीवर ७० धावा करणे हीदेखील मोठी गोष्ट आहे. केपटाऊनमध्ये त्याने शतक केले नसेल पण त्याने शानदार धावसंख्या उभारली. विराटने त्याचा दर्जा इतका उंचावला आहे की, जेव्हा तो शतक करतो तेव्हाच लोक त्याला यशस्वी मानतात.”
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

