Share

Eknath Shinde : भाजपसोबत मंत्रिपदांबाबत एकनाथ शिंदे यांचे ट्वीट! म्हणाले…

Published On: 

मुंबई : आपल्याच पक्षातील नेत्यांनी मोठा धक्का देत शिवसेनेला मोठी जखम दिली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना हा धक्का पचवणे अत्यंत कठीण गेले. एकनाथ शिंदे यांनी बंडाला सुरुवात केली आणि एकापाठोपाठ अनेक नेत्यांनी सेनेशी पाठ फिरवली. याचा परिणाम म्हणजे आज महाविकास आघाडी सरकार कोसळले. “आपल्याच माणसांनी पाठीवर घाव देत पुढची पायरी गाठली”, अशी परिस्थिती सध्या पहावयास मिळाली.

राजकारणात झालेल्या या ऐतिहासिक घटनेमुळे राजकीय वातावरणात एकच खळबळ उडाली आहे. देवेंद्र फडणवीस यांचा ‘मी पुन्हा येईल’ हा नारा खरा ठरणार का? या चर्चांना उधाण आलं आहे. भाजप सोबत किती आणि कोणती मंत्रिपदे जाणार याबाबत वावड्या उठायला लागल्या आहेत. मंत्रिपदाच्या याद्या अनेक ठिकाणी व्हायरल होत आहेत. मात्र बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे.

भाजपसोबत कोणती आणि किती मंत्रीपदे याबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही, लवकरच होईल. तोपर्यंत कृपया मंत्रिपदाच्या याद्या आणि याबाबत पसरलेल्या अफवा यावर विश्वास ठेवू नका अशा आशयाचं ट्विट एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.

भाजप सोबत कोणती आणि किती मंत्री पदे असणार याबाबत कोणतीही चर्चा झालेली नसल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. मात्र ही चर्चा लवकरच होईल असे देखील ते म्हणाले. तोपर्यंत कृपया मंत्रिपदाच्या याद्या आणि या संदर्भात पसरलेल्या अफवा यावर विश्वास न ठेवण्याचे आवाहन त्यांनी त्यांच्या ट्विटच्या माध्यमातून केलं आहे. कुणाला कुठलं मंत्रिपद मिळणार याकडं सर्वांच लक्ष लागलेलं आहे

महत्वाच्या बातम्या :

 

 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!