Share

Swara Bhaskar : उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर स्वरा भास्करची ‘ती’ पोस्ट चर्चेत

Published On: 

मुंबई : एकनाथ शिंदे यांचा बंड इतिहासात कायम आठवणीत ठेवला जाईल, कारण या बंडामुळे आज महाविकास आघाडी सरकार कोसळले आहे. शिंदे गटात शिवसेना नेत्यांनी शामिल होण्याचा निर्णय घेत मविआचा पाठींबा काढून घेतला. काल फेसबुक लाईव्ह येत उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देत आपले मुख्यमंत्री पद सोडले. ठाकरे सरकार कोसळल्यानंतर राजकीय क्षेत्रातून अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. त्याचबरोबार आता कलाकार देखील आपली प्रतिक्रिया मांडत आहेत. नुकतंच या संपूर्ण घटनेवर बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने प्रतिक्रिया दिली आहे.

स्वराने तिच्या ट्विटरवरून एक पोस्ट शेअर केली आहे. पोस्ट शेअर करत तिने लिहिले की, “तुमच्या नेतृत्वाबद्दल धन्यवाद!करोना काळात तुम्ही निःपक्षपाती आणि राज्याचे जबाबदार, पारदर्शक, संवाद साधणारे आणि आश्वासन देणारे नेते होतात. तुमच्या वागण्याने माझ्यासारख्या समीक्षकांनी देखील प्रशंसक बनवले. तुम्ही असताना महाराष्ट्र प्रशासनाने जे काम केलं ते तुमच्या वाखाणण्याजोगे आहे.” स्वराची पोस्ट सध्या खूप चर्चेत आहे. नेटकरी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

दरम्यान काल या सर्व घडामोडीनंतर भाजपकडून मोठ्या प्रमाणात जल्लोष करण्यात आला. तर भाजपच्या अनेक नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र सरकार स्थापन होण्याचा दावाही केला आहे. शिवसेनेच्या ३९ आमदारांनी बंड केल्याने आणि १० अपक्ष आमदारांनी साथ सोडल्याने महाविकास आघाडी सरकार आधीच संकटात आले होते. सरकार विश्वासमत सिद्ध करू शकणार नाही, असे स्पष्ट दिसत असताना उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला. आता देवेंद्र फडणवीस यांना राज्यपाल नवे सरकार स्थापन करण्यासाठी पाचारण करतील. भक्कम संख्याबळासह फडणवीस पुन्हा सत्तेत येणे निश्चित आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!