मुंबई : भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने सिंगापूर ओपन २०२२ स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. या बलाढ्य यशानंतर सिंधूने बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांसह आगामी स्पर्धांमध्ये आपली उत्कृष्ट कामगिरी सुरू ठेवण्याची आशा व्यक्त केली आहे. सिंधूने रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात चीनच्या झी ई वांग हिच्यावर २१-९, ११-२१, २१-१५ असा विजय मिळवला. आशियाई चॅम्पियनशिप सुवर्णपदक विजेत्या चीनच्या वांग हिला एक सेट जिंकता पण सिंधूने शानदार खेळ दाखवत सामना जिंकला. या विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक सेलिब्रिटींनी सिंधूचे अभिनंदन केले आहे.
२७ वर्षीय पीव्ही सिंधूने विजयानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले की, “गेल्या काही स्पर्धांमध्ये खडतर सामने झाले होते. माझ्यासाठी यामध्ये उपांत्यपूर्व आणि उपांत्य फेरीत पराभव स्वीकारणे थोडे त्रासदायक राहिले होते. प्रत्येक सामना महत्त्वाचा असला तरी शेवटी मी हा अडथळा पार केला आणि विजय मिळवला.”
सिंधू पुढे म्हणाली की, ‘मी खूप आनंदी आहे कारण मी खूप दिवसांनी सिंगापूरमध्ये आले आहे. अशात या ठिकाणी येऊन जिंकणे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. मी खूप दिवसापासून ज्या अडथळ्यांचा सामना करत होते तो अडथळा पार केला आहे. त्यामुळेच मी हे विजेतेपद मिळवू शकले. मला आशा आहे की उर्वरित स्पर्धांमध्येही हीच गती कायम राहील. आगामी सामन्यांमध्ये मी चांगली कामगिरी करेन.” दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सिंधूचे अभिनंदन केले आहे. पंतप्रधान मोदींनी ट्विट केले की, ‘पहिल्यांदा सिंगापूर ओपनचे विजेतेपद जिंकल्याबद्दल मी पीव्ही सिंधूचे अभिनंदन करतो. त्यांनी पुन्हा एकदा आपली अप्रतिम क्रीडा प्रतिभा दाखवून यश संपादन केले. देशासाठी हा अभिमानाचा क्षण असून ही कामगिरी आगामी खेळाडूंनाही प्रेरणा देईल.’
I congratulate @Pvsindhu1 on winning her first ever Singapore Open title. She has yet again demonstrated her exceptional sporting talent and achieved success. It is a proud moment for the country and will also give inspiration to upcoming players. https://t.co/VS8sSU7xdn
— Narendra Modi (@narendramodi) July 17, 2022
सिंधूकडे मात्र या विजयाचा जल्लोष करण्यासाठी जास्त वेळ नाही कारण तिचे लक्ष आता २८ जुलैपासून सुरू होणाऱ्या राष्ट्रकुल खेळांवर आहे. ती म्हणाली की, ‘माझ्याकडे यादरम्यान फक्त एक आठवड्याचा वेळ आहे. त्यानंतर राष्ट्रकुल स्पर्धेसाठी रवाना होईल. कदाचित मी एक दिवसाचा वेळ काढून माझ्या कुटुंबासोबत वेळ घालवू शकेन. माझ्यासाठी हा मोठ्या कालावधीचा दौरा राहिला आहे. दोन आठवडे इंडोनेशिया आणि मलेशियामध्ये खेळल्यानंतर लगेच सिंगापूरला यायचं होतं. त्यामुळे मी घरी जाईन आणि थोडी विश्रांती घेईन. यानंतर मी सरावाला सुरुवात करेन. मी या विजयाचा नक्कीच आनंद घेईन, याचा माझ्यासाठी खूप मोठा अर्थ आहे.’
सिंधूचे हे चालू मोसमातील तिसरे विजेतेपद असून आता तिचे संपूर्ण लक्ष राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेवर आहे. या खेळांमध्ये सिंधूने एकेरीत रौप्य आणि कांस्यपदकासोबतच सांघिक स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली आहे. यावेळी ती एकेरीत सुवर्णपदकाच्या दावेदारांमध्ये प्रमुख मानली जात आहे.
महात्वाच्या बातम्या :
- IND vs ENG : भारतासमोर २५९ धावांचे लक्ष्य, विराट कोहलीकडून चाहत्यांना मोठ्या खेळीची अपेक्षा
- Sandipanrao Bhumre | एकनाथ शिंदेंसमोर संदीपान भुमरे म्हणाले… ” मी मुख्यमंत्री झालो”
- Sharad Pawar | शरद पवारांनी जाहीर केला उपराष्ट्रपती पदाचा उमेदवार
- Flood | नाल्याच्या पुरात बैलगाडी वाहून गेल्याचे थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद
- SL vs PAK : सामना सुरू असताना ‘या’ पाकिस्तानी बॉलरने केला डान्स; VIDEO तुम्ही पाहिला का?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

