औरंगाबाद : सिल्लोड- सोयगाव मतदारसंघाचे आमदार अब्दुल सत्तार यांनी मुंबईत जोरदार शक्तीप्रदर्शन करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार केला. या सत्कार सोहळ्याला अनेक नेतेमंडळींनी उपस्थिती लावली. या सोहळ्यात “मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही”, असे म्हणत माजी मंत्री संदीपान भुमरे यांनी जवळपास अर्धा तास भाषण केले. याच भाषणात त्यांची जीभ घसरली आणि ते भलतंच काहीतरी बोलून गेले. भाषण करत असताना “एकनाथ शिंदेसाहेबांमुळेच मी मुख्यमंत्री झालो…”, असे भुमरे म्हणाले.
“एकनाथ शिंदेसाहेबांनी माझ्यासारख्या गरीब माणसाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यामुळेच मी मुख्यमंत्री झालो आणि त्यांच्यासाठी माझं पद जरी गेलं तरी चालेल”, असे संदीपान भुमरे म्हणाले. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या भाषणात भुमरे यांनी बंडखोरीपासून ते सत्ता स्थापनेपर्यंतचे अनेक किस्से सांगितले आणि त्याचीच सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Sharad Pawar | शरद पवारांनी जाहीर केला उपराष्ट्रपती पदाचा उमेदवार
- Flood | नाल्याच्या पुरात बैलगाडी वाहून गेल्याचे थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद
- SL vs PAK : सामना सुरू असताना ‘या’ पाकिस्तानी बॉलरने केला डान्स; VIDEO तुम्ही पाहिला का?
- Fish । बीडमधील केजडी नदीला माशांचा महापूर; मासे पहायला स्थानिकांची गर्दी
- KL Rahul : केएल राहुल वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी करतोय कसून सराव; पाहा ‘हा’ VIDEO!


